‘तारक मेहता..’ मधील दयाबेन आणि सुंदरलालच, खऱ्या आयुष्यात आहे ‘हे’ नातं, वाचून चकित व्हाल…

भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील लॉंगेस्ट रनींग शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला नावाजण्यात आलं. या मालिकेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात आली आहे. लॉंगेस्ट रनींग शो असला तरीही, या मालिकेची फॅन फॉलोविंग अजून देखील कायम आहे.
प्रेक्षकांना खळखळून हसवत मोलाचा संदेश देणाऱ्या या मालिकेचे चाहते परदेशात देखील आहेत. या मालिकेने विनोदी मालिकेचे इतर सर्वच विक्रम मोडत एक नवीन विक्रम केला आहे. माघील जवळपास दोन दशकांपासून ‘तारक मेहता..’ मालिका जगभरातील लोकांना हसवण्याचे आणि काही क्षण तरी आपला सर्व ताण, दुःख विसरायला लावते आहे.
आपल्या हटके अश्या विनोदी शैली मध्ये या मालिकेने कायमच सर्वांचे मनोरंजन केले आहे. याचे श्रेय केवळ मेकर्सला किंवा कोणत्याही एका कलाकाराला देता येणार नाही. याचे श्रेय या मालिकेमधील सर्वच कलाकारांना द्यायला हवे. या मालिकेमधील सर्वच कलाकारांनी आपली भूमिका उत्तम प्रकारे रंगवली, आणि आज जगभरात या सर्वांचे चाहते आहेत.
या मालिकेमध्ये सर्वच नाते खूपच सुंदर आणि रियलिस्टिक दाखवले आहेत. त्यापैकी एक नाते आहे दयाबेन आणि तिचा भाऊ सुंदरलाल यांचे. दयाबेन आणि सुंदरलाल या दोघांचे नातं खऱ्या खुऱ्या आयुष्यात भाव बहिणींचे नाते असते अगदी तसेच रेखाटले आहे. त्यामुळे कायमच हि जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
मात्र या दोघांचे खऱ्या आयुष्यात काय नाते असेल, असा विचार तुमच्याही मनात आला का? हे दोघेही आपल्य, भूमिकेशी इतके एकरुप होतात कि अनेक वेळा तुम्हाला देखील वाटले असेल कि हे दोघे खरे भाऊ-बहीणच तर नाही ना? तर याचे उत्तर आहे, होय. ददयाबेन म्हणजेच दिशा वकानी ही रियल लाईफ मध्ये सुंदरलाल म्हणजेच मयूर वकानी बहीण आहे.
या दोघांनी आपल्या ऍक्टिंग करियरची सुरुवात सोबतच केली होती. गुजराती फिल्म इंडस्ट्री मध्ये काही सिनेमा आणि मालिका केल्यानंतर या दोघांनी एकसोबतच,’तारक मेहता’ या मालिकेत काम केलं. आणि आश्चर्य म्हणजे या दोघांनाही खरी ओळख याच मालिकेने मिळवून दिली. या मालिकेने या दोघांनाही लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहचवले आहे.
मालिकेमध्ये दयाबेन आणि सुंदरलालची बॉण्डिंग खूपच मस्त वाटते, आणि याचे कारणसुद्धा हेच आहे की हे दोघे खऱ्या आयुष्यात भाऊ-बहीण असल्यामुळे सहाजिकच तेच प्रेम आपल्याला बघायला मिळाले.लग्नानंतर सध्या दिशाने ऍक्टिंग पासून ब्रेक घेतला आहे. मात्र, सुंदरलाल म्हणजेच मयूर वकानी आज गुजराती सिनेसृष्टीमधील एक मोठं नावं आहे. अनेक गुजराती सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.