‘तारक मेहता ..’च्या मेकर्सला अजून एक धक्का; ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री सोडणार मालिका ! समोर आले ‘हे’ कारण..

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेने साता समुद्र पार देखील, खूप चाहते कमवले आहेत. जेठालाल आणि त्याचे भले मोठे कुटुंब म्हणजेच गोकुलधाम सोसायटी मध्ये घडणाऱ्या घडामोडी जवळपास दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहे. सध्या हिंदी टेलिव्हिजन मध्ये स्टार प्लस ची मालिका अनुपमा सगळ्यात हिट मालिका आहे.
या नंबर १ साठी, अनेक मालिकांमध्ये चढाओढ नेहमीच बघायला मिळते. मात्र तारक मेहता हि मालिका कधीच या चढाओढीमध्ये नसते. कारण, कितीही मालिका आल्या आणि गेल्या, काही हिट ठरल्या कित्येक दिवस नंबर १ वर राहिल्या. मात्र तारक मेहता कायमच पहिल्या ५ हिट मालिकांमध्ये असते. आजही इतक्या वर्षानंतर या मालिकेने आपले स्थान अबाधित ठेवले आहे.
पण अनेक कलाकारांनी ही मालिका सोडल्यामुळे यात थोडे मनोरंजन कमी झाले आहे. विशेष म्हणजे दयाबेनची भूमिका करणी दिशा वकानीने मालिका सोडल्यानंतर दयाबेन हे पात्र साकारण्यासाठी दुसरी अभिनेत्री अजूनहि भेटली नाही. आणि त्यातच आता अजून एक अभिनेत्री ही मालिका सोडू शकते.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून हि मालिका चर्चेत आहे. या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांना क’र्करो’ग झाल्याने त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली आहे. त्यानंतर आता मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल Jennifer Mistry ही ग’रोद’र असल्यामुळे मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
या सर्व चर्चांवर आता खुद्द जेनिफरने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सर्व चर्चांवर उत्तर दिलं आहे. ‘मी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडल्याची चर्चा सुरु झाल्यापासून मला अनेकांचे फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत. काहींनी तर मला मी गरोदर आहे का, असाही प्रश्न विचारला आहे.
मात्र सत्य या सर्व गोष्टींपासून खूप वेगळं आहे. माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. माझ्या पायाला दुखापत झाल्याने मी चालू शकत नाहीये. त्यामुळे मी दमणला सुरू असलेल्या शूटिंगला जाऊ शकले नव्हते. मी माझ्या टीमशी सतत संपर्कात असून त्यांना कोणतीच स’मस्या नाही.
स्वत:च काही गोष्टींचा विचार करून लोक अशा उलटसुलट चर्चा का करतात, मला माहित नाही’, असं जेनिफर म्हणाली. गेल्या काही महिन्यांत या मालिकेतील काही कलाकारांमध्येही बदल झाले आहेत. अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताची जागा अभिनेत्री सुनन्या फौजदारने घेतली. तर सोढीची भूमिका साकारणाऱ्या गुरचरण सिंगची जागा बलविंदर सिंग सुरी यांनी घेतली.