टेलिव्हिजन सृष्टी हादरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाचे को’रोनाने नि’धन, पण ‘या’ कारणामुळे मानले सोनू सूदचे आभार..

देशातील सर्वात लोकप्रिय शो डान्स इंडिया डान्स चे नाव काढले कि आपल्या समोर कोण येत ? मिथुन दा, गीता माँ, टेंरेन्स आणि रेमो डिसुझा आणि सर्वात मुख्य पात्र म्हणजे, जय भानुशाली. या शो च्या सुरुवातीच्या काही सीझनचे सूत्रसंचालन जय भानूशालीने केले होते, आणि हा शो लोकप्रिय ठरण्याचे तो देखील एक प्रमुख कारण होता.
जय आणि त्याची पत्नी माही सतत हसत खेळत आणि नेहमीच मोठ्या उत्साहाने जीवन जगत असल्याचे आपण पाहतो. कोणताही शो असले किंवा कार्यक्रम असेल हे दोघे अगदी दिलखुलास हसत आणि प्रेमाने सर्वाना मिळत असल्याचे आपण बघतो. माही ने अनेक धमाकेदार असे पात्र रेखाटले होते. ‘लागी तुझसे लगन’ या मालिकेमध्ये तिने निभावलेली नकुशा ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या ध्यानात आहे.
झलक दिखला जा चौथ्या सीझनमध्ये तिने आपल्या डान्सची झलक दाखवली. त्यानंतर जय आणि माही या दोघांनी नच बलिये मध्ये भाग घेतला आणि आपल्या भन्नाट डान्स ने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यामुळेच जय आणि माही यांनी तो सिझन आपल्या नावे करत जिंकला होता.
त्या दोघांचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि सर्वांसोबत, प्रेमपूर्वक संबंध ठेवणे यामुळे या दोघांचा केवळ सर्व सामान्य जनतेमध्येच नाही तर सेलिब्रिटीज मध्ये देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे. याच सतत हसतमुख आणि दिलखूलास राहणाऱ्या जोडप्यावर दुःखाचा डोंगर को’सळला आहे. जय ची पत्नी माही हिने आपल्या छोट्या भावाला को’रोनामुळे गमा’वले आहे.
माहीच्या भावाला काही दिवसांपूर्वी को’रोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र सेलेब्रिटी च्या कुटुंबातील असून देखील, दवाखान्यात बेड मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी. सोनू सूद ने त्यांची मदत केली होती. त्यामुळेच माही ने एक भावुक पोस्ट लिहत सोनू सूद चे आभार मानले आहेत.
‘मला सतत वाटत होतं, माझा भाऊ सुखरूप वापस येईल. मात्र त्याची अव’स्था बघता हे अशक्य आहे असेही मला ठाऊक होते. मात्र, बेड्स मिळवण्यापासून तुम्ही सर्व मदत केली. प्रकृती मध्ये काहीही सुधार नसताना तुम्ही वारंवार डॉ’क्टर कडे त्याला कसे वा’चवता येईल याबद्दल बोलत होतात. आणि हे सगळं आम्हाला सांगण्याची तुम्ही हिम्मत होत नव्हती हे देखील मला ठाऊक आहे.
पण, तुम्ही केलेल्या या सर्व मदतीसाठी, आपुलकीसाठी खूप खूप आभार. भारती, तू तिथे होती. आणि मी ज्याप्रकारे त्याची काळजी घेतली असती त्याप्रकारे तू देखील त्याची काळजी घेतली यासाठी आभार.’ पोस्ट शेअर करत माही ने सोनू सूद च्या एका पोस्ट ला टॅग केले आहे. आपल्या पोस्ट मध्ये सोनू ने लिहले आहे, ‘एक उत्साहाने पूर्ण असा अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाला आम्ही गमावले आहे.
खूप प्रयत्न करून देखील त्याच्या प्रकृती मध्ये काहीच सुधारणा झाली नाही याचे मला खूप दुःख आहे. त्याच्या कुटुंबाला हे सर्व सांगण्याची मला हिंमत नाहीये.’ १ जून ला आपल्या भावाच्या मृ’त्यूची बातमी आल्यानंतर माही ने काही दिवसांपूर्वी आपल्या भावाचा एक फोटो शेअर करत लिहले होते कि,’मी तुला गमावले नाहीये; तर मी तुला मिळवले आहे.
असं वाटत आहे कि वेळेच्या माघे जाऊन तुला घट्ट आवळून मिठी मारावी आणि तुला कुठेच जाऊ देऊ नये. आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण तो देव आमच्या पेक्षा जास्त प्रेम तुझ्या वर करतो म्हणून तर तुला स्वतः कडे बोलवले आहे.’