अभिमानास्पद ! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री नुकतेच लग्न झाले असताना पतीसोबत चालवतेय गरजूंसाठी नाश्ता सेंटर…

को’रो’नाच्या या म’हाभ’यंकर काळामध्ये, पुन्हा एकदा अशी वेळ आली जिथे माणुसकी विसरत चालेल्या उभ्या मनुष्य जातीला पुन्हा एकदा माणुसकी काय असते याचा प्रत्यय आला. कित्येक लोकांनी आपले सर्वस्व देत,पुढे येऊन माणुसकी जपत गरजूंची मदत केली. याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
त्यातच अनेक सेलेब्रिटीनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारुन, पुढे आले आणि माणुसकी जपत अनेक गरजू आणि रु’ग्नांची मदत केली. कोणी जेवणाची मदत केली, तर कोणी औ’षधांची; कोणी कपड्यांची तर काहींनी आसरा देण्याचे देखील काम केले. त्यामध्ये केवळ बॉलीवूडकर नाही तर आपले मराठी कलाकार देखील अव्वल आहेत.
रुचिता जाधवने आपल्या लग्नाच्या सर्व खर्चातून, गरजुंना अन्न पुरवठा केला. तर स्वप्नील जोशी रस्त्यावर उतरून गरजूना औषध वाटत होता. हर्षवर्धन राणे आपली, आवडीची क’रोडोंची गाडी विकून त्यातून ऑक्सिजन सिलेंडर घेतले. सोनू सूद करत असलेलं काम तर शब्दांत वर्णन करताच येणार नाही. सर्वच सेलेब्रिटी आणि सर्वसामान्य जमेल तसे लोकांची मदत करत आहेत.
त्यातच आता अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे काम समोर आले आहे. या को’रो’नाकाळात देखील अनेक, मराठी कलाकारांनी आपले लग्न उरकून घेतले आहे. याच कलाकारांपैकी शुभांगी सदावर्ते हि देखील एक आहे. ‘संगीत देवबाभवळी’ या नाटकामध्ये अवलीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी ने मागच्या लॉकडाऊन मध्ये जुलै २०२० मध्ये संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत विवाह केला.
इतर क्षेत्रांप्रमाणेच सिनेसृष्टीला देखील या को’रोनाकाळामध्ये चांगलीच झळ बसलेली आपल्याला बघायला मिळाली आहे. काही तर बेरोजगार झाले असून त्यामध्ये त्यांना त्याची चांगलीच झळ सहन करावी लागत आहे. शुभांगी आणि तिचा पती आनंद याना देखील या काळात काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, त्यांनी वेगळा पर्याय निवडला आहे.
या दोघांनी मिळून, स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरु केला आहे. आर्थिक टंचाई म्हणून नाही तर, आवड म्हणून त्यांनी या व्यवसायाची निवड केली आहे. शुभांगीने श्रीपाद फूड्स नावाने आपल्या व्यवसाय सुरु केला आहे. श्रीपाद फूड्स न्याहरी म्हणून नाश्ता सेंटर तिने सुरु केले आहे. आमचे लग्न लॉकडाऊन मधेच झाले. सगळीकडेच कामे ठप्प पडली.
तेव्हा घरगुती लाडू, पीठे आणि चटण्या पोहोचवण्याचा छोटासा उद्योग सुरु केला आहे. मग गणपतीची चॉकोलेट मोदकांना खास मागणी आली आणि नंतर दिवाळी मध्ये देखील फराळाला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली. श्रीपाद फूड्स ने काहीच वेळात चांगलीच प्रसिद्धी कमवली.
याच काळात, श्रीपाद न्याहरी ची संकल्पना शुभांगीच्या डो’क्यात आली होती आणि अखेर तिने ती वास्तवात देखील उतरवली. आमच्या वर अशी वेळ आली नाहीये,पण आवड म्हणून आम्ही हे काम करत आहे. आम्ही दोघेही कलाकार आहेत, त्यामुळे या काळामध्ये आम्हाला काम नाही. म्हणून आम्ही आवड म्हणून हे काम सुरु केले आहे असे शुभांगी सांगते.