‘जाती के बारे मे क्यो नं बोलू सर…’ ‘सैराट’ची आर्ची दिसणार एका नव्या भूमिकेत, ‘आशा’ बनून लढणार स्त्रियांच्या संरक्षणाचा लढा!

रिंकू राजगुरू अर्थातच आर्ची आता बॉलीवूड मध्ये देखील दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये ती आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने रिंकू राजगुरु हिने मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालून दिला होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. हा चित्रपट मराठीमध्ये एवढा चालला की या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर हा चित्रपट हिंदी मध्ये देखील रिमेक करण्यात आला होता. हिंदी मध्ये धडक या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
या चित्रपटात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दोघे दिसले होते. हिंदीमध्ये हा चित्रपट अधिक कमाई करू शकला नाही. मात्र, या चित्रपटाची खूप मोठी चर्चा झाली होती. हिंदी मधील चित्रपटाला देखील अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. त्यानंतर रिंकू राजगुरू हिला मराठीत काही चित्रपट मिळाले. मात्र, तिला हवे तसे यश मिळाले नाही.
आता रिंकू राजगुरु हिंदी चित्रपटात देखील लवकरच दिसणार आहे. झी प्रॉडक्शनने आपला नवीन चित्रपट येणार असल्याचे सांगत याबाबत ट्रेलर नुकताच ऑनलाइन प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘200 हल्ला हो’ असे आहे आणि हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अमोल पालेकर, अभिनेता बरून सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या भूमिका आहेत.
चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट एका गंभीर समस्येवर आधारित आहे. या चित्रपटाचा व्हर्च्युअल ट्रेलर नुकताच एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला आहे .’200 हल्लाबोल हा’ चित्रपट वंचित, उपेक्षित आणि द’लित महिला व अ’त्याचा’राला वाचा फोडणारा चित्रपट आहे.
ज्यावेळेस अ’न्याय असाही होतो. त्यावेळेस दोनशे महिला एकत्र येऊन कशा प्रकारे उत्तर देतात, याबाबतची सत्य घटना या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली की, या चित्रपटात मी साकारणारी भूमिका अतिशय दर्जेदार अशी आहे. या चित्रपटात एका मुलीची भूमिका मी साकारली आहे.
वर्षानुवर्ष स्त्रि’यांवर होणारा अ’न्याय पाहिलेली एक द’लित कुटुंबात मधील मुलगी पुढे येते. स्त्रि’यांवर अ’त्याचा’र केल्यानंतरही त्या गप्प का बसतात, असा प्रश्न तिला या चित्रपटात पडत असतो. त्यानंतर ती अ’त्याचा’रा विरोधात आवाज पुकारते, अशी या चित्रपटाची कथा आहे.
उपेंद्र लिमये ची भूमिका
या चित्रपटामध्ये अमोल पालेकर यांच्यासह इंद्रनील सेंनगुप्ता यांची देखील भूमिका आहे. यासोबत उपेंद्र लिमये हा देखील यामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटांमध्ये अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करायला भेटणे हे माझे सौभाग्य आहे, असे देखील रिंकू राजगुरु म्हणाली आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरु हिला विशेष मेहनत घ्यावी लागली आहे. कारण तिला बोलण्याची पद्धत बदलावी लागली आहे. याच प्रमाणे तिला आपले वजन देखील कमी करावे लागले आहे.