‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार जिजामाता, १० वर्षांनंतर टीव्हीवर करतेय कमबॅक..

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार जिजामाता, १० वर्षांनंतर टीव्हीवर करतेय कमबॅक..

स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सगळिकडेच या मालिकेची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांवर आणि सरदारांच्या शौर्यच्या गाथा या मालिकेमधून दाखवण्यात येणार आहेत.

ज्या कथा केवळ ऐकल्या आणि वाचल्या आहेत आता त्या पडद्यावर बघायला मिळणार म्हणून प्रेक्षकांमध्ये देखील या मालिकेबद्दल चांगलीच उत्सुकता आहे. अजिंक्य देव सारखे दिग्गज अभिनेते या मालिकेमध्ये, बाजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी या भूमिकेसाठी काही वेगळी तैयारी देखील केली, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीपासूनच फिट समजल्या जाणाऱ्या अजिंक्य देव यांना बाजींच्या भूमिकेत बघण्यासाठी रसिक आतुर आहेत. त्यातच आता अजून एक दिग्गज कलाकार या मालिकेमध्ये राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर आली आहे. आजवर मृणाल देशपांडे आणि प्रतीक्षा लोणकर यांनी राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारल्या होत्या.

आणि त्यांच्या दमदार अभिनयामुळे अनेक चाहत्यांच्या मनात त्यांनी आपली वेगळी अशी जागा निर्माण केली. आता हीच ऐतिहासिक भूमिका साकारण्याचे सौभाग्य निशिगंधा वाड यांना लाभले आहे. निशिगंधा वाड यांनी सुरुवतीपासूनच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. आपली आई विजया वाड यांच्याकडून मिळालेल्या वारसा म्हणून त्या इतिहासाचा अभ्यास देखील करतात.

त्यामुळे सुरुवातीपासून अश्या ऐतिहासिक भूमिका साकारण्याची त्यांची इच्छा होती. मात्र आता ती संधी मिळाली आहे.’ हा एक दैवी योगच आहे, मला इतकी महत्वपूर्ण भूमिका साकारण्यास मिळत आहे. जन्माचं सार्थक झाल्यासारखंच आहे. एक अशी स्त्री जिने संपूर्ण, इतिहासच पालटून टाकला.

आपल्या शौर्य आणि पराक्रमसोबत स्वराज्य आणि स्वाभिमानाचे बाळकडू, आपल्या मुलाला देऊन, मराठा साम्राज्य उभारण्यास प्रवृत्त केले. ही भूमिका साकारायला मिळणं, म्हणजे खरोखर जन्माचं सार्थकच झाले.’ असं निशिगंधा वाड म्हणाल्या. जवळपास १० वर्षानंतर निशिगंधा वाड टीव्हीवर परतत आहेत.

आपल्या कमबॅक साठ, इतकी दमदार अशी भूमिका साकारण्यास मिळत आहे म्हणून त्या खूपच उत्सुक आहेत. निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी सिनेमामध्ये काम केलं आहे. काही हिंदी सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र राजमाता जिजाऊंच्या भूमिकेसाठी त्यांनी आपली जोरदार तैयारी सुरु केली आहे.

पूर्वीपासून इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या निशिगंधा वाड यांनी पुन्हा नव्याने आपला अभ्यास सूर केला आहे. हि अभूतपूर्व अशी भूमिका साकारताना कोणतीही कसर त्यांना ठेवायची नाहीये, असं देखील त्यांनी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या आणि त्यागाच्या कथा या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *