‘जगणं सोडता येत नाही’ म्हणत ! को’रोनाने वडिलांचे नि’धन झाल्यामुळे ‘ही’ मराठी अभिनेत्री करतेय शेतात काम…

को’रो’नाच्या म’हामा’रीने सर्वत्र थैमा’न मांडले. त्यात अनेक दिग्ग्ज कलाकारांचा या को’रोनाच्या लाटेमधे मृ’त्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण सिने सृष्टी दुःखात होरपळून निघत आहेत. या मध्ये खास करुन मराठी चित्रपट सृष्टीने अनेक दिग्ग्ज कलाकारांना गमावले आहे.
त्याचबरोबर अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या काही खास लोकांना, तर काहींनी थेट आपल्या कुटुंबियांना गमावले असल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना अनेक दुःखद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी भूषण कडू यांनी आपल्या पत्नीला को’रोनामुळे गमावल्याचे समोर आले. भूषण याना एक छोटा मुलगा आहे,
त्यामुळे त्यांची परि’स्थिती खूपच बि’कट झाली असून त्यातून वर येण्यास त्यांना वेळ लागत आहे. असाच भीषण दुःखाचा डोंगर अश्विनी महांगडे यांच्यावर देखील पडला आहे. १८ मे रोजी त्यांच्या वडिलांचा को’रोनामुळं मृ’त्यू झाल्याचे बातमी आली होती. त्यानंतर त्यांनी, आणि त्यांच्या अनेक सहकलाकारांनी दुःख व्यक्त केले होते.
को’रोनाची ला’गण झाल्याचे समोर आल्यानंतर जसे डॉ’क्टर सांगतील तशी ट्रीटमेंट तिच्या वडिलांची सुरु होती. मात्र तरीही त्यांना वाचवण्यात, डॉ’क्टरांना यश मिळाले नाही. आपल्या दुःखातून सावरल्यानंतर, अश्विनी यांनी आपले दुःख आणि मनस्ताप आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले होते. डॉ’क्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट न केल्यामुळेच, आपल्या वडिलांनी प्रा’ण गमा’वले असा थेट आरोप अश्विनी यांनी केली होती.
मृ’त्यूच्या वेळी तिचे वडील ५६ वर्षांचे होते. अश्विनी या आपल्या सडेतोड भूमिकेमुळे सतत ओळखल्या जातात. कदाचित त्यांनी मालिकेमध्ये निभावलेल्या पत्राचा प्रभाव त्यांच्यावर पडला असावा. अश्विनी याना आधी देखील काही मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये आपण पहिले आहे. मात्र स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये तिने राणू अक्का हे अगदी प्रभावशाली भूमिका रेखाटली होती.
तिच्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेने तिला राज्याच्या घराघरांत पोहोचवले. तिच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले आणि आजही, प्रेक्षकांच्या मनात तिची भूमिका अजरामर आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनघा च्या भूमिकेत ती झळकत आहे. याच मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान, आपल्या वडिलांना गमावल्याची बातमी तिला मिळाली होती.
त्यानंतर,ती खूप दुःखी झालेली आणि कसे तरी दुःख सह’न करत असलेली आपल्याला बघायला मिळत होती. मात्र नुकतंच तिने आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती थेट शेती करत असलेली बघायला मिळाली. आपल्या वडिलांना शेती खूप आवडते. आणि हळदीची शेती देखील त्यांना खूप आवडत होती म्हणून तिने आपल्या शेतात, हळद लावली आहे.
‘ज्या बाबींमुळे मला माझ्या आबांच्या जवळ असण्याचा भास होतो ते, सर्व मी करत आहे. त्यामुळे ते माझ्याच जवळ आहेत असे मला वाटत आहे’ असे तिने आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे. ‘जगणं सोडता येत नाही!! लढणं सोडता येत नाही! आज शेतात हळद लावली’ हे तिच्या पोस्ट मधील खास आकर्षण होते.