छोट्या पडद्यावर संजय नार्वेकर यांची धडाकेबाज एंट्री ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन..

काही वर्षांपूर्वी आपण महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटांमध्ये अभिनेता संजय दत्त हा दिसला होता. मुंबई अं’डरव’र्ल्डवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाने त्यावेळी प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटांमध्ये नम्रता शिरोडकर देखील दिसली होती. तसेच संजय दत्तच्या आई वडिलांचे काम हे अनुक्रमे शिवाजी साटम व रीमा लागू यांनी केले होते.
संजय दत्त याचा हा एकमेव असा चित्रपट आहे की या चित्रपटाला संजय दत्त याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटांमध्ये संजय दत्त याचा मित्र दाखवण्यात आला आहे. या अभिनेत्याचे नाव चित्रपटात देड फुट्य असे दाखवण्यात आले आहे. तर या अभिनेत्याचे खरे नाव संजय नार्वेकर असे आहे. संजय नार्वेकर यांनी या चित्रपटातून खरी ओळख मिळवली.
त्यानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील मिळाल्या. खबरदार नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. या चित्रपटात संजय नार्वेकर याने अतिशय चांगली भूमिका केली होती. संजय नार्वेकर याने अनेक चित्रपटात देखील काम केलेले आहे. नाटक मालिका यामध्ये देखील त्याने काम केलेले आहे. मात्र, मालिकांमध्ये तो जास्त दिसलेला नव्हता.
मराठी चित्रपट बोक्या सातबंडे हा देखील त्याचा प्रचंड चालला होता. महेश मांजरेकर यांनी काही वर्षापूर्वी हिंदीमध्ये अनेक चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामध्ये मराठी कलाकारांना त्यांनी खूप मोठी संधी दिली होती. वास्तवमध्ये देखील त्यांनी अनेक मराठी कलाकारांना घेतले होते. केवळ संजय दत्त हा हिंदी भाषिक होता. तसेच दीपक तिजोरी हा देखील याच दिसला होता.
असे असले तरी शिवाजी साटम, रीमा लागू, किशोर नांदलस्कर, उषा नाडकर्णी, भरत जाधव, सतीश राजवाडे यासारख्या भूमिका या चित्रपटात दिसल्या होत्या. हा चित्रपट त्यावेळेस खूप चालला होता. दीड वर्षापासून अनेक मालिका व चित्रपटाचे चित्रीकरण हे बंद पडले आहे. त्यामुळे अनेकांकडे सध्या काम नाही. यामध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
त्यामुळेच दिग्गज कलाकार देखील आता जे चित्रपट मालिका मिळतील ते करत आहेत. कारण त्यांच्या जवळची आर्थिक पुंजी ही जवळपास संपलेली आहे. त्यामुळे असे निर्णय घेताना दिसतात. अभिनेता संजय नार्वेकर हा देखील आता एका मालिकेत दिसणार आहे. या निमित्ताने तो छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. संजय नार्वेकर ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’ या मालिकेत दिसणार आहे.
आपल्याला आता आश्चर्य वाटेल की, संजय नार्वेकर या मालिकेत कुठल्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय नार्वेकर या मालिकेमध्ये इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याचे नाव गौतम साळवी असे दाखवण्यात आलेले आहे. हा पोलीस अतिशय इमानदार असल्याचे दाखवण्यात आले आहे.
तसेच तो डॅशिंग आहे आणि सर्वांना मदत करतो, असे यात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता संजय नार्वेकर याची भूमिका कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याआधी संजय नार्वेकर याने खबरदार, अग बाई अरेच्या या चित्रपटातही काम केले आहे.