छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, “जीव माझा गुंतला” मालिकेत साकारणार मुख्य भूमिका….

छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, “जीव माझा गुंतला” मालिकेत साकारणार मुख्य भूमिका….

मराठी मालिका, घराघरात पहिल्या जातात. या मालिका, आणि त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही मालिका अगदी थोड्याच वेळात चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करतात आणि त्यामधील पात्र देखील त्यांना आपले जवळचे वाटायला लागतात. अश्या अनेक मालिका सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरु आहेत, आणि अनेक मालिका होऊन देखील गेल्या आहेत.

चार दिवस सासूचे, पासून ते आई कुठे काय करते पर्यंत मालिकांचे कथानक भलेही बदलले असतील. मात्र, एक गोष्ट नाही बदलली, आणि ते म्हणजे त्या मालिकांसाठी आणि त्या मालिकांमधील पात्रांसाठी चाहत्यांचे वेड. कोणत्याही मालिकेचा प्रोमो आला कि त्या मालिकेचे कथानक काय आहे, काय वेगळं आहे अशी उत्सुकता निर्माण होते.

असेच एका नवीन मालिकेचे प्रोमो माघील काही दिवसांपासून चांगलीच धूम करत आहे. कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला मालिकेचे प्रोमो सुरू झाले तसे, प्रेक्षकांच्या मनामध्ये या मालिकेसाठी बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.या प्रोमो मधून मालिकेचे कथानक चांगलेच वेगळे आणि रोमांचक असेल असे भासत आहे.

त्यामुळे या मालिकेचे कथानक नक्की काय असेल? कोण कोणते कलाकार या मालिकेत असतील? अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. मात्र या मालिकेच्या प्रोमो मध्ये सर्वात आकर्षक ठरली ती मालिकेचे प्रमुख पात्र निभावत असणारी अभिनेत्री. हि अभिनेत्री काहीशी ओळखीची वाटत आहे, घाडगे & सून या मालिकेमधील कियारासारखी दिसणारी हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे.

घाडगे & सून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आणि या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अबाधित स्थान कमवले.आजही या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या अजून देखील स्मरणात आहेत. कियाराची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि तिचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता.

हीच कियारा अर्थात प्रतिक्षा मुणगेकर आता तीन वर्षानंतर पुन्हा एकदा कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” या नव्या मालिकेमधून तिच्या चाहत्यांना भेटायला येत आहे. असे सांगितले जात आहे कि मालिकेमध्ये तिची खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. मात्र प्रोमो वरून कदाचित तीच प्रमुख भूमिकेत असेल असे भासत आहे. ‘चित्रा खानविलकर’ असे आता प्रतिक्षाच्या भूमिकेचे नाव आहे.

याबद्दल बोलत असताना ती सांगते, “खरं सांगायचं तर मला घरी परतल्यासारखं वाटत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर मी पुन्हा कलर्स मराठीवर मालिका करत आहे आणि टेल-अ-टेल मीडियाचं प्रॉडक्शन हाऊस आहे, हा एक योगायोगाच म्हणावा लागेल. वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊसने माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे कि आता त्यामुळे माझी जबाबदारी भरपूर वाढली आहे असं मला वाटतं.

खूप मजा येते आहे सेटवर, तीच लोकं आहेत आजूबाजूला, खूप सकारात्मक वातावरण आहे. त्याच जोमाने काम करणार आहे. ज्याप्राकरे कियारावर प्रेम केलं तसेच चित्रावर देखील करा हीच इच्छा आहे. दोन वेगळ्या अगदी टोकाच्या विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर काय घडतं? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असंच काहीसं घडणार आहे असे मालिकेचे कथानक असावे.

ते दोघे एकमेकांचा तिरस्कार करतात,मात्र नियतीचा डाव कोणी ओळखला आहे, नियतीचा खेळ नेहमीच आपल्या अपेक्षेच्या पलीकडला असतो, असे काही यात दाखवण्यात येणार आहे. मल्हार-अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे ;बघणे चांगलेच रोमांचक असणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *