चुलीवर स्वयंपाक करणारी खान्देशातील ‘ही’ मुलगी बनली सुपरमॉडेल, तिच्या लुक्सवर मराठीच नाही तर बॉलिवूडदेखील आहे फिदा…

चुलीवर स्वयंपाक करणारी खान्देशातील ‘ही’ मुलगी बनली सुपरमॉडेल, तिच्या लुक्सवर मराठीच नाही तर बॉलिवूडदेखील आहे फिदा…

झगमगती मॉडेलिंग इंडस्ट्री आजही कित्येक मुलींचे स्वप्न आहे. आजही आपल्या देशात मॉडेलिंग इंडस्ट्री कडे चुकीच्या नजरेने बघितले जाते. त्यामुळे तिथे, वर्चस्व तर सोडाच मात्र, एक मॉडेल देखील बनण्याचा विचार चुकीचा समजला जातो.

या डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे, बऱ्यापैकी मुलींना त्या क्षेत्राची ओळख मिळते, तिथे कसा प्रवेश करता येईल, अशा काही अगदी बेसिक गोष्टींची माहिती मिळते. मात्र दूर गावाकडे राहणाऱ्या मुलींचे काय ?. आजही आपल्या देशात सगळीकडे डिजिटल प्लॅटफॉर्म नाहीये. त्यात गावाकडे खूप कमी लोकं त्याचा वापर करत असलेले आपल्याला बघायला मिळते.

मग तिथे राहणाऱ्या मुलींसाठी, मुंबई मध्ये येणे आणि मॉडेलिंगची सुरुवात करणे, अशक्यंच. त्याचबरोबर गावाकडे या क्षेत्राला अगदी खालच्या पातळीचे समजले जाते म्हणून, कुटुंबाचा विरोध येणारच. मात्र,अश्या सर्व समस्यांना तोंड देत, एका माळरानावर राहणाऱ्या मुलीने थेट मुंबईच्या मॉडेलिंग इंडस्ट्री मध्ये आपले नाव कमवले आहे.

चाळीसगावच्या, कोणत्या तरी खेड्यात राहणाऱ्या दृशा मोरेने हे शक्य करून दाखवले आहे. ती सध्या मॉडेलिंग जगातलं एक मोठं नावं आहे. मात्र मुंबईपर्यंतचा हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. तिने एमटीव्ही च्या ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर’ च्या २०२० च्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

त्यावेळी तिचा अगदी भन्नाट लूक होता. ड्रेडलॉक्स म्हणजेच जटा आणि अगदी बोल्ड अंदाज अशी तिची ओळख होती. या शोमध्ये तिच्या ड्रेडलॉक्समुळे ती कायम सर्वांच्या नजरेत राहिली. तिच्या हटके लूकमुळे ती, सुरुवातीलाच शोचे जज मिलिंद सोमण, मलायका अरोरा आणि मसाबा यांना आकर्षित केले.

त्यानंतर ती प्रत्येक टास्क मध्ये उत्तम आणि उत्तमच करत गेली. तिच्या एका फोटो कडे बघून मलायका अरोरा बोलली होती कि,’आता मी जेलस फील करत आहे. तुझ्या ड्रेडलॉक्स चा मला प्रचंड हेवा वाटत आहे’ त्यावेळी दृशाने आपल्या प्रवसाबद्दल सांगितले,’खान्देशातील चाळीसगावच्या अगदी, छोट्या खेड्यात राहत होती.

तिच्या घरी जीन्स घालायला देखील मज्जाव होता, मात्र तिने हार मानली नाही आणि मुंबईला आली. मुंबईला आली तेव्हा तिला काहीच माहित नव्हत, कुठे फोटोशूट केलं पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे. यापैकी काहीच माहित नव्हतं, पण तिने मार्ग शोधला आणि आपले स्वप्न पूर्ण केले.’

आजही ती घरी गावाकडे गेली कि साडी घालते, विहिरीतून पाणी काढते. चुलीवर स्वयंपाक करते, या सर्वांची तिला आवड आहे. ती पुढे बोलते की, आपण कितीही मोठं झालं तरी आपले खरे गाव, आपली जागा सोडली नाही पाहिजे. ती, या स्पर्धेमध्ये जिंकली नाही मात्र तिची चर्चा सगळीकडेच जास्त होती. त्यानंतर देखील तिला बऱ्याच मॉडेलिंग असायनमेंट मध्ये मिलिंद सोमण सोबत बघण्यात येते. सध्या ती ती एक टॉप ची मॉडेल आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *