चित्रपटसृष्टीच्या आलेल्या ‘या’ भ’यंकर अनुभवामुळं, वर्षा उसगावंकरच्या दोन्ही बहिणींनी सिनेमासोडून करिअरसाठी निवडले दुसरेच क्षेत्र

चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री जेव्हा हिट होते, तेव्हा तिच्या बहिणीसाठी आणि मुलीसाठी सीएनसृष्टीची दारं उघडीच असतात. त्यामुळे, अनेक वेळा आपण पहिले आहे की, दोघी बहिणी एकाच क्षेत्राची निवड करतात आणि चांगलीच लोकप्रियता कमवतात. प्रसिद्धी आणि लोकप्रियता सर्वांनाच हवी असते.
बॉलीवूडचं काय तर मराठी आई साऊथ सिनेसृष्टीमधे देखील आपल्याला असे अनेक उदाहरण बघायला मिळतील. मात्र असे खूप कमी उदाहरण आहेत की, बहिणीला भरगोस यश मिळालं आणि अनेक सिनेमांची ऑफर येऊन देखील त्यास नकार देऊन आपले वेगळं क्षेत्र निवडले. असंच काही आहे प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या बाबतीत.
वर्षा उसगांवकर यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक सिनेमा केले आहेत. ८०-९०च्या काळात वर्षा यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. गमंत जंमत, शेजारी शेजारी, लपंडाव, भुताचा भाऊ, हमाल दे धमाल अशी एकमाघून एक अनेक हिट सिनेमा वर्षा उसगांवकर यांनी दिले.
त्यांचे निरागस हास्य, त्याहून सुंदर चेहरा आणि दमदार अभिनय या जोरावर त्यांनी सहजपणे हिंदी सिनेमामध्ये पदार्पण केले. तिरंगा या सिनेमामध्ये नाना पाटेकर आणि त्यांची जोडी प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यानंतर परवाने, हस्ती, दूध का कर्ज सारख्या हिट सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले.
९०च्या दशकात आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या वर्षा पन्नाशीतही तेवढ्याच सुंदर दिसतात. सध्या सुख म्हणजे काय असतं या मालिकेत वर्षा माईची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेत भरजरी साडी आणि मराठमोळ्या पेहरावात त्यांचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. वर्षा यांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल सर्व काही माहित आहे, मात्र आल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्या फारस बोलत नाही.
त्यांना तोषा आणि मनीषा नावाच्या दोन बहिणी आहेत. या दोघीही वर्षा यांच्या इतक्याच सुंदर आहेत. त्यांना अनेकवेळा मराठी सिनेमा ऑफर देखील झाले होते मात्र त्यादोघीनींही यास नकार दिला. वर्षा सांगतात, ‘एकदा माझी बहीण माझ्यासोबत शूटिंग बघायला आली होती. एक थोडा किचकट सिन होता आणि डायरेक्टर हवा तसा शॉट मिळत नव्हता.
म्हणून अनेक वेळा आम्हाला तोच सिन करावा लागत होता. शिवाय, वेळ देखील खूप झाला होता. सिन शूट होऊपर्यंत सेटवर कोणीच जेवण केले नाही. हे सगळं बघून माझी बहीण मला बोलली, हे असं एखाद वेळेस होत की सारखं. कधी कधी असं होतंच असते, असं माझ्या सहकलाकारने तिला सांगितले आणि तिला जाम टेन्शन आलं.
एका सिन साठी इतक्या वेळ शूट करायच हे काही शक्य नाही, असं ती मला म्हणाली. त्यानंतर त्या दोघीनी कधीच सिनेमा करावा म्हणून पुढाकार नाही घेतला.’ तोषा या एका डॉक्टर आहेत, आणि गोव्याला त्यांच स्वतःच रुग्णालय आहे. तर मनीषा या मोठ्या उद्योजिका आहेत. गोव्यातील बऱ्याच मोठाल्या कंपनीचं मॅनेजमेंट त्याच बघतात. तोषा आणि मनीषा या दोघीही वर्षा यांच्याप्रमाणेच आपल्या क्षेत्रात चांगल्याच यशस्वी आहेत.