‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आता निलेश साबळे नाही तर ही व्यक्ती करणार अँकरिंग..?

मनोरंजन
‘चला हवा येऊ द्या’ एक असा कार्यक्रम ज्याने, सर्वाना खळखळून हसवायला शिकवले. आपल्या धावपळीच्या, रोजच्या ताण-तणावाच्या जीवनात काही क्षण शांत, आपला सर्व त्रास विसरून विनोदाचा आनंद कसा घ्यायचा, हे चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने सर्वाना शिकवले. एक खूप उत्तम अशी लाफ्टर थेरपी म्हणून, अनेकजण चला हवा येऊ द्या बघण्याचा आनंद घेतात.
त्यामुळे, या कार्यक्रमाची कायमच लोकप्रियता उत्तम आहे. या कार्यक्रमातील कलाकार नेहमीच प्रसिद्धीची शिखरावर असतात. भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर करांदे ,अंकुर, योगेश शिरसाट, उमेश जगताप या सर्वांना चला हवा येऊ द्या मधून एक नवीन ओळख मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मल्टी-टॅलेंटेड निलेश साबळे मागील अनेक वर्षांपासून करत आहे, त्याची खास विनोदी शैली आणि कॉमिक टाइमिंग याचे नेहमीच कौतुक करण्यात येते.
निलेश साबळे मराठी सिनेसृष्टी मधील एक मोठं आणि तेवढेच लाडकं नाव आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तो खूपच उत्तम प्रकारे करतो. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश करणार, मग त्या कार्यक्रमामध्ये विनोदाची लाट येणार हे नक्कीच असते. पण, चला हवा येऊ द्या च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, आता निलेशचे सूत्रसंचालन संकटात सापडल्याचे बघायला मिळत आहे.
त्याच्या जागी एक दुसरा लाडका कलाकार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार, असे प्रोमोमध्ये बघायला मिळत आहे. हा व्हिडियो बघून अनेकांना प्रश्न पडला होता; तर याचा उलगडा आपण आता करू या. चला हवा येऊ द्या, या मंचावर आजवर निलेश साबळेने अनेक सेलिब्रिटीजचे गुपित उघड केला आहे. पण आता त्याच्या जागी एक चिमुकली सूत्रसंचालन करत असल्याचे बघायला मिळत आहे.
हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होत आहे. ‘माझी तुझी रेशिम गाठ’ या मालिकेतील सर्वांची आवडती बालकलाकार म्हणजेच मायरा वायकुळ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असल्याचे बघायला मिळत आहे. इतकच नाही तर झी मराठीवरील उत्सव नात्यांचा या सोहळ्यात अँकरिंग कोण करणार, या मुद्द्यावरून ती निलेश सोबत चांगलाच वा’द घालताना दिसत आहे.
या चिमुकलीचे आणि निलेशचे भांडण बघून प्रेक्षक मात्र खळखळून हसत आहेत. ‘मीच झी मराठी वरील उत्सव नात्यांचा या सोहळ्यात अँकरिंग करणार,’ असे मायरा निलेशला चांगेलच ठणकावून सांगताना बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, मायरा ‘चला हवा येऊ द्या’ या शोची सुरुवात करताना दिसते.
मायराने अगदी सुंदर असा गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे, आणि त्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप क्युट दिसत आहे. मायराला तिथे बघुन निलेश चकित होतो आणि म्हणतो, ‘तू झी मराठी अवॉर्डचा अँकरिंग करणार आहेस का?’ त्यावर मायरा म्हणजेच परी म्हणते हो. तिच्या होकारावर निलेश पुन्हा म्हणतो, ‘त्या कार्यक्रमाचे अँकरींग तर मी करणार आहे.
चॅनल कडून मला फोन देखील आला होता आणि मोठा चेक देखील मला मिळणार आहे.’ त्यावर परी निलेशला म्हणते, ‘तुला फक्त चेक मिळणार आहे. पण मला खूप सारे बिस्कीटचे पुढे आणि चॉकलेट मिळणार आहेत.’ असे उत्तर परीने दिले. त्यानंतर संपूर्ण मंचावर एकच हशा पिटली.