‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेचा पती आहे ‘हा’ प्रसिद्ध निर्माता ! पहा खास आहे दोघांची लव्हस्टोरी…

‘चला हवा येऊ द्या’चे नाव ऐकले तरीही, चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं. आपल्याला आवडलेला कोणता तरी एक जुना किंवा नवा विनोद आठवतो, ज्याने आपल्याला खळखळून हसवले आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, या शोमुळे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. आपला सर्व ताण विसरुन, काही क्षण तरी, या शोचा आनंद घेतो.
काही काळ का होईना, पण आपले दुःख, चिंता, ताण सर्व काही विसरुन, आपल्या विनोदाच्या महासागरात हा शो आपल्याला घेऊन जातो. या शोमध्ये, नेहमीच सर्व कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारत असतात. त्यांच्या या भूमिकेमध्ये हास्यतरंग उमटवणे तसं तर अवघडच ठरत. मात्र हे कलाकार अगदी सहजपणे, सर्वच पात्र-भूमिका रंगवतात.
त्यामुळे, ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या चाहत्यांनी अक्षरशः या सर्व कलाकारांना डोक्यावरच उचलून धरलं आहे. छोट्या पडद्यावरील रसिकांना खळखळून हसवत, दिलखुलास मनोरंजन करणारा शो म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या शो ने अल्पावधीतच सर्व रसिकांचा लाडका शो बनला आहे.
या शोचे चाहते केवळ राज्यात किंवा आपल्या देशातच नाही तर साता-समुद्रापार संपूर्ण जगात ख्याती कमवाली आहे. शोमधील या विनोदवीरांची त्यांच्या थुकरटवाडीत केलेली सर्व धम्माल रसिकांना खूपच भावली आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे. चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो.
मात्र या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडे चांगलीच अग्रेसर आहे. श्रेया या शोमध्ये अगदी, हटके भूमिका साकारुन रसिकांचं भरगोस मनोरंजन करते. म्हणूनच श्रेया खूपच अल्पावधीच प्रेक्षकांची खूपच लाडकी अभिनेत्री बनली आहे. याच श्रेयाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. श्रेया पक्की पुणेकर असली तरीही ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.
२७ डिसेंबर २०१५ रोजी, श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला होता. श्रेया आणि निखिल दोघांचे लव्ह मॅरेज आहे. एका मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. निखिल पाहताच श्रेयाच्या प्रेमात पडला होता त्यामुळे त्याच मालिकेच्या सेटवर, निखील नेहमीच श्रेयासोबत मैत्री करण्याचा सतत प्रयत्न करतच असे.
पण, थोड्याच वेळात त्या दोघांमध्ये काही तरी बिनसलं आणि चांगलाच वा’द झाला. या वा’दामुळे ते दोघं एकमेकांपासून दूर गेले होते. मात्र त्यांच्यातला हा दुरावा काही फार काळ राहिला नाही. एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता, म्हणून निखीलच्या नावाची क्रेडिट लाईन श्रेयाने पाहिली. आणि निखिलला शुभेच्छा देण्याकरिता फोन केला.
यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा संवाद सुरु झाला तो कायमस्वरूपीची नात्यामध्ये रूपांतरित झाला. त्याच काळात निखीलच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. आधीच निखीलला श्रेया आवडत होती आणि म्हणून त्याने तिला तू सिंगल आहेस का अशी विचारणा केली. त्यावर श्रेयाने हो असं उत्तर देताच निखीलने फार वेळ न दवडता तिला प्रपोज केले.
या काळामध्ये श्रेया देखील निखिल या खूपच उत्तम प्रकारे समजू लागली होती. आणि त्यामुळे जसे, श्रेयाला निखिलने लग्नासाठी विचारले तिने सहाजिकच हो असं उत्तर दिलं. दोघांच्याही कुटुंबीयांच्या सहमतीने त्यांचं लग्न जुळलं. मात्र आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकांसह खुश आहेत.