“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळेची प’त्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, दिसायला आहे अतिशय सुंदर, पाहा फोटो…

‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सगळ्यांचा आवडता आहे. केवळ सामान्य लोकांमध्येच नव्हे तर सेलिब्रेटींमध्ये देखील हा कार्यक्रम प्रसिद्ध असून मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेकांनी आ’जवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाद्वारे कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, निलेश साबळे लोकांचे मनोरंजन करतात.
निलेशचा या कार्यक्रमातील वावर त्याच्या चाहत्यांना प्र’चंड आवडतो. ‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’, असं म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करत निलेश साबळे सर्वांच्या भेटीला येतो आणि प्रेक्षकांचे मन जिंकतो.
निलेशने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले होते. नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटात देखील त्याने काम केले आहे.
पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळेच मिळाली. आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने ‘चला हवा येऊ द्या’ शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
निलेशच्या अभिनयाचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक फॅन आहेत. निलेश हा आज अभिनेता असला तरी त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याने आज अभिनेता, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात आपले नाव क’मावले आहे.
निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
निलेश आज मोठा स्टार असला तरी तो इतर अभिनेत्यांप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसतो. त्याच्यामुळे त्याच्या वै’यक्तिक आ’युष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. निलेशविषयी आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत.
२०१० मध्ये निलेश साबळे वि’वाहब’द्ध झाल्याचे म्हटले जाते. त्याची पत्नी गौरी साबळे ही दिसायला अतिशय सुंदर आहे. तिने निलेशला त्याच्या कारकिर्दीतील आलेल्या चढ- उतारांमध्ये साथ दिली आहे. निलेश आणि गौरी दोघेही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात.