घरात प्रवेश करताच आदिशने घेतला ‘जय’सोबत पंगा; अंगावर जात म्हणाला बॉडी-बिडी दाखवून मला…

घरात प्रवेश करताच आदिशने घेतला ‘जय’सोबत पंगा; अंगावर जात म्हणाला बॉडी-बिडी दाखवून मला…

मनोरंजन

बिग बॉस मराठीच्या आता चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. माघील आठवड्याच्या खेळाच्या आधारावर, प्रेक्षकांनी मॉडेल आणि अभिनेता अक्षय वाघमारेला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य चांगलेच भावुक झाल्याचे बघायला मिळाले. घरात प्रवेश केलेल्या १५जणांपैकी आता १३ जण बाकी आहेत.

आपल्या ख’राब प्र’कृतीमुळे कीर्तनकार शिवलीला पाटील यांना घराच्या बाहेर जावे लागले आणि त्यानंतर कमी व्होट्स मिळाल्यामुळे अक्षय देखील घराच्या बाहेर पडला आहे. मात्र असं झालं असलं तरीही, सध्या घरात १४च सदस्य आहेत. कारण या आठवड्याच्या सुरुवातीलाच, मोठा ट्विस्ट मेकर्स घेऊन आले आहेत. घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

अभिनेता आदिश वैद्य याने आता बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री घेतली आहे. जयोस्तुते या मराठी मालिकेमधून त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तुमचं आमचं सेम असतं, रात्रीस खेळ चाले, जिंदगी नॉट आऊट, कुंकू टिकली आणि टॅटू सारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले. सोबतच नागीण, बॅरिस्टर बाबू आणि गुम है किसी के नाम मे सारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील त्याने काम केलं आहे.

त्याचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्याच्या बिग बॉसच्या घरातल्या एन्ट्रीमुळे त्याचे फॅन्स चांगलेच उत्सुक आहेत. दरम्यान, घरात एंट्री घेताना बिग बॉसने त्याला एक मह्त्वपुर्ण काम दिले.घरातील कोणत्याही तीन सदस्यांची, घरचा पहारेदार म्हणून निवड करायचे कार्य त्याला बिग बॉसने दिले. त्याने नक्की कोणत्या तीन सदस्यांची निवड केली हे तूर्तास समोर आले नाहीये.

मात्र एका व्हिडियोने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या व्हिडियोमध्ये, जय पहारेकरी म्हणून बिग बॉसच्या घराच्या दरवाज्याजवळ उभा असल्याचे बघायला मिळत आहे. आदिश आणि जय या दोघांमध्ये चांगलाच राडा झाल्याचे, या व्हिडियोडमध्ये बघायला मिळत आहे. जय आपल्या सवयीप्रमाणे, आदिशच्या अंगावर चालून गेला.

मात्र आदिशने देखील त्याला चांगलेच उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्या दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले असल्याचे त्या व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे. घरातील इतर सदस्य त्यांना दूर करत, शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत असं या व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे. ‘मला फालतू अटीट्युड द्यायचा नाही. मला ते चालणार नाही.

माझ्या इतक्या जवळ यायचं नाही. बॉडी-बिडी तुझी तुझ्या जवळ. माझ्या अंगावर यायचं नाही. पुन्हा जर तू माझ्या इतक्या जवळ आणि अंगावर आलास, तर.. बिग बॉस मी आधीच बोलत आहे. तो पुन्हा जर माझ्या इतक्या जवळ आला तर, रुल्स-बिल्स गेले उडतं. मी कशाचाच विचार करणार नाही,’ असं आदिश बोलताना व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे.

त्यावर,’तू तरी स्वतःला कोण समजतो? तू आहेस तरी कोण? जे पण आहे ते, तू तुझ्या कडे ठेव. मला उगाच चिडायला लावू नको. फुकट खुन्नस दाखवत आहे,’ असं जय बोलत असल्याचे व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे. नक्की कोणत्या मुद्द्यवरून त्या दोघांमध्ये भां’डण झाले हे अजून समजले नाही, मात्र आदिशच्या येण्यामुळे बिग बॉसच्या घरातील गटबाजी आणि खेळ कसा बदलतो हे बघणे नक्कीच रोमांचक ठरेल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.