‘गाढवाचं लग्न’ चित्रपटात गावरान भूमिका करणारी ‘गंगी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा आता दिसते अशी…

‘गाढवाचं लग्न’ चित्रपटात गावरान भूमिका करणारी ‘गंगी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न, पहा आता दिसते अशी…

‘गाढवाचं लग्न’ मकरंद अनासपुरे यांचा हा चित्रपट आजही लोकांच्यात तितकाच लक्षात आहे. या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांची कॉमेडी टाईमिंग प्रत्येकाला अतिशय आवडली होती. आजही या चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग कमी झाला नाही. आजही तितक्याच आवडीने हा चित्रपट बघिलता जातो.

पण या चित्रपटात अजून एक व्यक्तिरेखा अशी होती जिच्यावर अपुसकच प्रेक्षकांची नजर पडली. आणि ती व्यक्तीरेखा होती गंगीची. गंगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले. ‘गंगी’ला आजही लोक विसरलेले नाहीत. या चित्रपटात ‘गंगी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती अभिनेत्री राजश्री लांडगे यांनी.

आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत प्रमुख भूमिकेत त्यांना काम करता आलं, या संधीचे सोनं करत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात तिने एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट सुपरहिट झाला, पण ‘गंगी’ मात्र नंतर चित्रपटातक्षेत्रात फारशी दिसली नाही.

‘गंगी’ या व्यक्तिरेखेसाठी तिची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा छान गावरान पद्धतीचा होता. राजश्रीने या व्यक्तिरेखेचा लहेजा एवढा उत्तम पकडला, की तिच्या या भूमिकेसाठी सगळ्यांकडूनच खूप कौतुक झालं. चित्रपटात गावरान भूमिका केली असली, तरी राजश्रीला खऱ्या आयुष्यात मॉडर्न राहायला आवडतं. गंगीचा मॉडर्न लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘गाढवचं लग्न’मधली ही गावरान ‘गंगी’ आता खूप ग्लॅमरस झाली आहे. राजश्रीने आपल्या हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून ‘हीच का ती पडद्यावरची गंगी’, असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. राजश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेले बोल्ड आणि हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

चित्रपट सृष्टीपासून काही काळ दूर राहिलेल्या राजश्रीने ‘सिटीझन’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीबरोबरच निर्माता म्हणून पदार्पण करत, चित्रपटाची कथा आणि वेशभूषासुध्दा सांभाळली होती. तिच्या कारकिर्दीची आणि सामाजिक कार्याची दखल घेत तिला ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. राजश्रीने ‘सिटीझन’ चित्रपटात प्रमुख भूमिका देखील साकारली होती. ती या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसली होती.

राजश्री लांडगेच जन्म पुण्यात झाला. तिला अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती, पण तिला लहांपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाचे स्वप्न घेऊन तिने मुंबई गाठली. सुरुवातीला तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले. मात्र, ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली.

मोजकंच पण चांगल्या भूमिका निवडण्याकडे कल असलेली राजश्री सोशल मीडियावर सक्रिय आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक प्रश्नांसाठी काम करणं, मदत करणं यामध्येही ती आघाडीवर असतात. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठीही तिने सढळहस्ते मदत केली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *