‘क्रांती रेडकर’ची नवाब मालिकांवर खोचक टीका, म्हणाली; आमचं कॅरेक्टर छान आहे पण नवाब मलिक ‘हे’ एक कॅरेक्टर…

मनोरंजन
२ ऑक्टोबरला, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा अर्थात आर्यन खान याला एनसीबीने ड्र’ग्स प्र’करणामध्ये अटक केली. त्यानंतर त्याच्यावरती चांगलीच कारवाई सुरू आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांना पा’र्टीबद्दल टीप मिळताच, सापळा रचून अचानकपणे त्या पा’र्टीवर धा’ड टाकली. आणि तेथील उपस्थित अनेक दिग्गजांना अटक केली.
यामध्ये अनेक उद्योजकांचे मुलं, सेलिब्रिटींची मुलं आणि काही मॉडेल्सचा देखील समावेश आहे. ही कामगिरी समीर वानखेडे यांनी समर्थपणे पार पाडली. यापूर्वी देखील समीर वानखेडे यांनी, अनेक सेलिब्रिटीजला ड्र’ग्स प्रक’रणामध्ये अ’टक केली होती. सुरुवातीचे काही दिवस समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सगळीकडे होती.
मात्र ती त्यांचे कौतुक करण्यासाठी होती. आता जवळपास महिना लोटला असला तरीही, आर्यन खानला जा’मीन मिळाला नाहीये. त्यामुळे आता बॉलीवूडकर समीर वानखेडे यांना टार्गेट करत असल्याचे बघायला मिळत आहे. पण सध्या सगळीकडे आर्यन खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या नावाचा बोलबाला असल्याचे बघायला मिळत आहे. समीर वानखेडे प्रसिद्धी आणि पै’से याकरिता केवळ सेलिब्रिटीजला टार्गेट करतात, अशी टीका देखील अनेकांनी केली आहे.
केवळ कोणत्या एका पक्षाच्या नेत्यांनीच नाही तर, सोशल मीडियावर अनेक सर्वसाधारण व्यक्ती देखील समीर वानखेडे यांना, इतर ठिकाणी सुरू असलेल्या ड्र’ग्स बद्द’ल विचारत आहेत. तिथे कारवाई न करता समीर वानखेडे केवळ सेलिब्रिटीजलाच टार्गेट करत त्यांच्यावर कारवाई का करतात, हा प्रश्न आता उघडपणे अनेक जण विचारत आहेत.
त्यातच महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याच्या मुलाचे नाव उचलून धरण्याचा प्रयत्न एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी केला होता. केवळ ब’दना’मी करण्याच्या दृष्टीने, केलेला हा प्रयत्न महाराष्ट्रातील काही नेत्यांना अजिबात रुचला नाही. त्यामुळे त्यांनी देखील समीर वानखेडे यांच्यावर प्रतिवार करायला सुरुवात केली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला आहे.
त्याबद्दलचे काही पुरावे देखील त्यांनी सर्वांना दिले आहेत. समीर वानखेडे यांची पहिली पत्नी देखील मुस्लिमच आहे. पण आता मराठी अभिनेत्री आणि समीर वानखेडेची दुसरी पत्नी क्रांती यांनी नवाब मलिकांवर खोचक टी’का केली आहे. ‘हि काय चाळीतली भां’डण आहेत का? याचे गुपित उघडा करूया. अतिशय बिलो-द-बेल्ट सर्वकाही सुरू आहे.
प्रकरणाबद्दल काही असेल तर बोला. आमच्यावरती वैयक्तिक टी’का करण्याची काय गरज आहे? माथेफिरू लोकांची कामं असतात ही सगळी. तुमच्या वरती आणि तुमच्या कुटुंबवरती आम्ही काही टी’का केली आहे का? आम्हाला हवं आणि वाटलं तर तुमच्या कुटुंबाचे देखील सर्व गुपित आम्ही उघड करू शकतो. हे असं वागून त्यांना काय मिळणार आहे? खरा बघता या एनसीपीच्या नेत्याने कॅरेक्टर शिकलं पाहिजे कॅरेक्टर.
त्यांनी आमच्यावरती एवढं सगळं करून सुद्धा आम्ही त्यांच्या विरोधात एकही ट्विट केलं नाही. हे आमचं कॅरेक्टर आहे. त्यांचं काय घाण कॅरेक्टर हे त्यांनी दाखवून दिलं.’ असं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांवर टी’का केली आहे. तिच्या या टी’केला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र इतक्या ज्येष्ठ नेत्यावर ती अशा प्रकारचे टी’का करणे कितपत योग्य आहे, असा सवाल अनेक नेटिझन्सने उपस्थित केला आहे.