कौतुकास्पद ! डॉक्टर म्हणाले चालूही शकणार नाही; आज तीच आहे ‘या’ प्रसिद्ध ‘डान्स शो’ची जज..

मनोरंजन
जिद्द! हा एक असा शब्द आहे; जो प्रत्येकाने आपली आयुष्यात बाळगला पाहिजे. जिद्द असेल तर, अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात. या पुस्तकी भाषा आपण अनेकवेळा ऐकल्या आहेत. मात्र असे अनेक उदाहरण आहे, ज्यांनी आल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर खरोखरच अशक्य ठरणाऱ्या गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री, सुधा चंद्रन तर सगळ्यांना माहीतच आहे. सुधाने काही साऊथच्या सिनेमामध्ये काम केले आणि त्यानंतर हळूहळू बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यातच, अचानक तिचा अ’पघा’त झाला आणि नृत्यामध्ये पारंगत असणाऱ्या सुधा चंद्रन यांचा एक पाय त्या अ’पघा’तात गेला. मात्र त्या खचल्या नाही.
त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून, त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. कृत्रिम पायाच्या मदतीने त्यांना चालता येईल पण त्या कधीच नृत्य नाही करू शकणार असं डॉ’क्टरांनी सांगितले होते. मात्र, सुधा चंद्रन यांनी आपली जिद्द सोडली नाही, डॉ’क्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम आणि उपचार पूर्ण करत त्या पुन्हा नृत्य करू शकल्या.
त्याची, हि कथा अनेकांना प्रेरणा देते. तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण लोकप्रिय डान्सर-कोरियोग्राफर शक्ती मोहनची देखील अशीच काही कथा आहे. नृत्यप्रेमींना शक्ती मोहनचे नाव नक्कीच माहित असेलच. लोकप्रिय डान्स रियालिटी शो, डान्स इंडिया डान्स २ ची विजेती आणि डान्स प्लस या शोची जज शक्ती मोहनचे लाखो चाहते आहेत.
तिने आपल्या नृत्याने आणि निरागस अशा स्माईलने कायमच मोहात पाडले. शक्ती सुरुवातीपासूनच अभ्यासात पुढे होती, त्यामुळे आयपीएस होण्याच्या दृष्टीने तिने आपली वाटचाल सुरु केली होती. पण तिला नृत्याची देखील आवड होती. म्हणून तिने २००६ मध्ये तिने रीतसर नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतरच तिने, डान्स इंडिया डान्सच्या दुसऱ्या पर्वात सहभाग नोंदवला आणि जिंकला देखील.
तेव्हापासूनच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर तिने, गीता माँ म्हणजेच गीता कपूर आणि रेमो डिसुझा यांना त्यांच्या काही सिनेमासाठी असिस्टंट म्हणून देखील काम केले. प्रभुदेवा दिग्दर्शित राउडी राठोड या सिनेमामध्ये, पल्लू के नीचे या गाण्यामध्ये तिने ठुमके लगावले. यामध्ये तिच्या हॉटनेसची आणि नृत्याची चांगलीच चर्चा रंगली होती.
नृत्यामध्ये पारंगत असणाऱ्या शक्तीला एकेकाळी डॉ’क्टरांनी, तू कधीच चालू सुद्धा शकणार नाही असं सांगितलं होत. शक्ती अवघी ४ वर्षांची असताना, तिच्यासोबत एक खूप मोठी दु’र्घट’ना घडली होती. एका अ’पघा’तामध्ये तिचा पाय आणि कंबर या अवयवांना चांगलीच दु’खापत झाली होती. कित्येक महिने ती रु’ग्णालयातच होती. डॉ’क्टरांनी तिच्या आईवडिलांना सांगितले होते की, ती कधीही चालू शकणार नाही.
पण, आपल्या मुलीच्या आत्मविश्वासावर तिच्या वडिलांचा पूर्ण विश्वास होता. ती चालेल आणि उत्तुंग शिखरं गाठेल याची त्यांना हमी होती. आजच्या घडीला शक्ती त्याच यशाच्या शिखरांवर आहे. म्हणून तर, शक्ती आपल्या आयुष्यातून सर्वाना जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जीवावर जग जिंकण्याची प्रेरणा देत आहे.