कौतुकास्पद ! कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही सयाजी शिंदे जगतात असे जीवन, वाचून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल..

कौतुकास्पद !  कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही सयाजी शिंदे जगतात असे जीवन, वाचून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल..

मनोरंजन

कलाविश्व हे खूप मोठे जग आहे. यामध्ये, आपल्या देशातील चित्रपटविश्व देखील जगभरात ओळखले जाते. आपल्या देशातील अनेक कलाकारांना जगभरात ओळखले जाते. अपार यश आणि कीर्ती, अनेक कलाकारांच्या नशिबात आली. यश, प्रसिद्धी आणि भरगोस लोकप्रियता जेव्हा, कोणाच्याही पदरी येते.

तेव्हा हे सर्व प्रत्येकालाच सांभाळता येते असं नाही. बऱ्याच वेळा आपण पाहिलं आहे की, हवं असलेलं यश आणि प्रसिद्धी जेव्हा मिळते तेव्हाजवळपास सर्वचजणांमध्ये बदल होतोच. खास करून, कलाकारांना जेव्हा यश मिळते तेव्हा त्यांच्यामध्ये नक्कीच बदल होतो. मात्र, अशा झगमगत्या चंदेरी दुनियेत स्वतःचा साधेपणा जपणे खूप अवघड असते.

असे खूप कमी कलाकार असतात जे, या झगमगत्या दुनियेत स्वतःचा साधेपणा टिकवून आहेत. मराठमोळ्या नाना पाटेकर यांची बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख आहे. आज जगभरात नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक वेगवेगळे अवॉर्डस आणि पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. मात्र, तरीही त्यांची राहणी अगदी साधारण आहे. त्यामुळे, सगळीकडेच त्यांचे खूप कौतुक केले जाते.

त्यांच्याच सोबत अजून एका मराठमोळ्या अभिनेत्याचे देखील खूप कौतुक केले जाते. दाक्षिणात्य सिनेमाचा सर्वात प्रसिद्ध खलनायक, म्हणून सयाजी शिंदे याना ओळखले जाते. साऊथच्या अनेक सिनेमामध्ये त्यांनी खलनायक म्हणून, भूमिका साकारली आहे. वेट्टाईकरण, अथाडू, आर्या, पोकिरी, बादशाह, बॉस, बिझनेसमॅन नं १ यासारख्या सुपरहिट सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे.

बॉलीवूड मध्ये देखील अनेक सिनेमामध्ये त्यानी काम केले आहे. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, भिकारी, ढोलकी सारख्या मराठी सिनेमामध्ये देखील ते झळकले होते. साऊथमध्ये एका सिनेमामध्ये काम करण्यासाठी ते भली-मोठी रक्कम घेतात. त्यांचे केवळ मुंबई आणि पुणेच नाही तर साऊथमध्ये हैद्राबाद, बंगलोर अशा ठिकाणी देखील फ्लॅट्स आहेत.

त्यांना महागड्या एक्सयूव्ही गाड्या अवडतात. त्यांच्याकडे अनेक महागड्या आहेत. कोट्यवधी संपत्तीचे मालक असणारे सयाजी शिंदे, निर्मातेसुद्धा आहेत. मात्र असे असले तरीही, त्यांना साधे राहणेच आवडते. सयाजी शिंदे एक पर्यावरण प्रेमी आहेत. आपले पर्यावरण वाचावे आणि त्यासाठी सर्वानी जागरूक व्हावे यासाठी ते चांगलेच प्रयत्न करत आहेत.

त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये ते सांगतात की,’माणसाकडे कितीही पैसे आले, कितीही यश मिळाले तरीही मानसिक शांती असणे सर्वात महत्वाचे असते. त्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात, मनुष्याने जायला हवे. वृक्ष आपल्याकडून काहीही न घेता केवळ आपल्याला देतात. ज्याप्रमाणे सर्व मनुष्याचे वाढदिवस आपण साजरे करतो, त्याचप्रमाणे सर्व वृक्षांचे देखील वाढदिवस साजरे केले गेले पाहिजे.

मी अनेकवेळा, जाताना जिथे मोठा वृक्ष दिसेल तिथे थांबून निसर्गाच्या सन्निध्याचा आनंद घेतो.’ अनेकवेळा पर्यावरणाच्या सान्निध्यातील, अनेक फोटोज बघायला मिळतात.त्यांच्या या जीवनशैलीचे सर्वचजण नेहमीच कौतुक करतात. पर्यावरणाचा आनंद घेत असताना, ते नेहमी मनुष्याला स्वतःला प्रश्न विचारायला सांगतात, पैसे आवश्यक आहे पण पर्यांवरणामुळं आपण जिवंत आहोत, त्यामुळे काय महत्वाचं आहे याचा निर्णय स्वतःच घ्या.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *