को’रोनामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा, ‘या’ ७ दिग्गज मराठी कलाकारांनी गमावला आपला जी’व…

कलाकार पडद्याआड जातो, मात्र त्याच्या कलेद्वारे तो त्याच्या चाहत्यांच्या मनात जिवंत असतो. को’रोनाच्या म’हामा’रीने सगळीकडेच मृ’त्यूचे थैमान मांडले आहे त्यामध्ये सर्व सामान्यांपासून, दिग्ग्ज व्यक्तींना देखील आपल्या विखळ्यात अडकवले आहे. सध्या देश को’रोनासोबत दोन हात करत आहे. त्यामध्येच सर्वसामान्यांसोबत अनेक नेते, उद्योगपतो, कलाकार म्हणजेच दिग्ग्ज सेलिब्रिटीज व्यक्तींना आपण ग’मावले आहे.
या काळामध्ये, मराठी चित्रपटसृष्टीचे खूप नुकसान झाले आहे. कधीही न भरता येणारी खूप मोठी पोकळी, या को’रोनाकाळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पडली आहे. यामध्ये अनेक दिग्ग्ज कलाकारांना मराठी चित्रपट सृष्टीने गमावले आहे.
1. किशोर नांदलस्कर :- वास्तव सिनेमातील संजय नार्वेकर च्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या किशोर यांना कदाचितच कोणी ओळखत नसेल. अनेक मराठी , हिंदी सिनेमामध्ये काम करणारे किशोर सर्वांच्याच आवडीचे अभिनेते होते. तब्ब्ल ४० नाटकं, २५ हुन अधिक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते.
२० पेक्षा जास्त मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होत. गोविंदाच्या, ‘जिस देश मे गंगा रहता है’ मध्ये त्यांच्या कामाने त्यांना नवीन ओळख मिळून दिली होती. खाकी, हलचल, सिंघम, ये तेरा घर ये मेरा घर सारख्या प्रसिद्ध सिनेमामध्ये देखील ते झळकले होते. एप्रिल मध्ये त्यांचे को’रोनामुळे नि’धन झाले.
2. अभिलाषा पाटील :- छिछोरे या सिनेमामध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटील या खूप कमी वयातच, को’रोनामुळे हे जग सोडून गेल्या. बायको देता का बायको, प्रवास या अविस्मरणीय अश्या सिनेमामध्ये त्यांनी आपली छाप सोडली होती. दमदार अभिनय आणि वेगळी अशी आपली शैली मुळे त्यांनी अनेक सिनेमा, मालिकांमध्ये काम केले आहे.
3. हेमंत जोशी :-जवळपास दोन दशकं, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी अशी छाप सोडणारे हेमंत जोशी यांचे देखील नुकतेच को’रोनामुळे १९ मे रोजी नि’धन झाले. सध्या ते जीव झाला येडापीसा या लोकप्रिय मालिकेमध्ये भावेंची भूमिका साकारत होते. नाटक, सिनेमा आणि मालिका सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाने त्यांनी नाव कमवले होते.
4. नवनाथ गायकवाड :-छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवर बनलेल्या फर्जंद आणि फत्तेशिकस्त या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणाऱ्या नवनाथ गायकवाड यांचा तरुण वयातच को’रोनामुळे मृ’त्यू झाला.
5. विजय वैरागडे :-कोर्ट या सिनेमाचे नायक वीरा साथीदार म्हणजेच विजय वैरागडे यांचा ६२व्य वर्षी को’रोनामुळे नि’धन झाले. त्यांच्या या चित्रपटाची निवड ऑस्कर साठी झाली होती. तेव्हा त्यांच्या अभिनयाची जोरदार चर्चा रंगली होती.
6. अमोल धावडे :-मुळशी पॅटर्न, देऊळबंद या दमदार सिनेमामध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेता अमोल धावडे यांचे को’रोनामुळं नि’धन झाले. त्यांच्या निध’नानंतर प्रवीण तरडे यांनी एक अत्यंत भावुक पोस्ट लिहून त्यांना श्रदांजली दिली होती. निर्व्यसनी, धडधाकट, नियमित व्यायाम करणारा एक जिवाभावाचा माझा मित्र को’रोनाने गिळंकृत केला असे प्रवीण यांनी लिहले होते.
7. आशालता वाबगावकर :-आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रकारणाच्या दरम्यान आशालता याना को’रोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृ’त्यू झाला. माघील वर्षी सप्टेंबर मध्ये तत्यांचे निधन झाले. आशालता यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये आणि सिनेमामध्ये काम केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.