कोकण फक्त ट्रिप आणि सुट्टी एन्जॉय करण्यापुरतं आहे का ? पहा भरत जाधव यांची भावनिक साद ऐकून डोळ्यात येईल पाणी…

कोकण फक्त ट्रिप आणि सुट्टी एन्जॉय करण्यापुरतं आहे का ? पहा भरत जाधव यांची भावनिक साद ऐकून डोळ्यात येईल पाणी…

को’रोनाच्या दाहकतेमधून थोडा दिलासा मिळाला होता तोच आता पुन्हा निसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे. पावसाच्या रूपात जणू काळच बरसत आहे. कोकण म्हणजेच रत्नागिरी, रायगड भागात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसाने, अनेक कुटुंब उध्वस्त केली आहेत.

या भ’यंकर पावसाने अनेकांचा प्रा’ण घेतला आहे. गावच्या-गावे उ’ध्वस्त झाली आहेत. या भया’नक परिस्थितीमध्ये अनेक हृ’दयद्रा’वक दृश्य समोर येत आहेत. देशातील सर्वात सुंदर असणार कोकण, आज जणू आपली अस्त्वित्वासाठी झ’गडत आहे. या भ’यंकर परि’स्थितीमध्ये कोकणला मदतीची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी समजून घेत, त्वरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनस्थाळाला भेटी दिल्या आहेत.

तेथील नागरिकांना दिलासा दिला आहे, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. या भीषण आणि दुःखद परिस्थितीमध्ये, राज्याने आणि राज्य सरकारने आपली जबाबदारी स्वीकारली आहे. येथील सर्व नागरिकांच्या पुनर्वसनाची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची सर्व जबाबदारी आम्ही घेत असून त्यासाठी आराखडा आखण्यात येत आहे.

त्यादृष्टीने लवकरच महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, पुन्हा नव्याने संसार उभारायचा म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी केवळ पैसे नाही तर, सर्व छोट्याला गोष्टींची गरज आहे. त्यामुळे केवळ पर्यटन म्हणून येणाऱ्या सर्वानी कोकणच्या उभारणीला हातभार लावावा अशी भावनिक साद कोकणचे पुत्र भारत जाधव यांनी जनतेला घातली आहे.

‘युथ फॉर डेमोक्रॉसी’ असं हॅशटॅग वापरत आपल्या सोशल मीडियावरून भारत जाधव यांनी तरुणाईला आणि खास करून नेटिझन्सला कोकणच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. चला आपल्या कोकणला मदतीचा हात देऊ या. जास्त दिवस राहतील असे खाद्यपदार्थ, म्हणजेच सुका मेवा, बिस्कीट इ. सोबतच महिलांसाठी अंतर्वस्त्रे आणि अंथरून-पांघरून कोकणच्या जनतेपर्यंत पोहचवू या.

असे पोस्ट करत, त्यासाठी कोणत्या शहरांतून मदत करताना कोणत्या क्रमांकावर संपर्क करता येईल हेदेखील त्याने त्यामध्ये नमूद केलं आहे. ‘कोकण फक्त मौजमजा किंवा एन्जॉय करण्यासाठी नाहीये, तिथं सुद्धा लोक राहतात. अगदी साधी आणि सिम्पल आयुष्य जगतात. खूप माफक गरजा आहेत त्यांच्या. त्यामुळे, आपल्या मदतीचा एक हात पुढे करा.

आणि कोकण आणि कोकणच्या जनतेची मदत करा,’ अशी अत्यंत भावनिक साद भारत जाधव यांनी घातली आहे. दरम्यान त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देखील मिळत आहे. अनेक, सामाजिक संस्था पुढे येऊन कोकणची मदत करत आहेत. त्यातच, राज्य सरकारने देखील येथील जनतेला मदतीचे आश्वासन दिले आहे.

‘कोकण पुनर्वसन ही केवळ सरकारची नाही, तर सर्वच जनतेची जबाबदारी आहे. पावसाळ्यात, किंवा सुट्टीच्या वेळी कोकण फिरायला जातो, तिथे जाऊन मस्त एन्जॉय करतो. आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवतो, आता त्याच कोकणला तुमची साथ, आणि तुमच्या मदतीची गरज आहे’ असे आर्वजून भरत जाधव बोलले आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *