किर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्षची जी’भ घ’सरली ! म्हणाला; माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला…

मनोरंजन
माघील काही दिवसांपासून, चाहत्यांची जणू पर्वणीच सुरु आहे. क्रिकेटप्रेमींसाठी, आयपीएलचे सामने पुन्हा सुरु झाले आहेत. तर, रियालिटी शो प्रेमींसाठी, बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु झाले आहे. आयपीएलचा जितका मोठा चाहतावर्ग आहे, तेवढाच जास्त बिग बॉस मराठीचा देखील चाहतावर्ग आहे.
बिग बॉसचा पहिला आठवडा संपला असून, आता दुसरा आठवडा सुरु झाला आहे. त्यामानाने पहिला आठवडा, चांगलाच मनोरजंक ठरला. सर्वच स्पर्धाकांनी, स्वतःला प्रकाशझोतात आणून, लोकप्रिय होण्यासाठीची तैयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक, स्पर्धकांना यश आले आहे. तर काही स्पर्धक त्यामानाने, अजूनही माघेच आहेत.
मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, गायत्री दातार, जय दुधाने, या सर्व स्पर्धकांनी आपला वेगळा गट बनवला असलयाचे बघायला मिळत आहे. म्हणून, पहिल्याच आठवड्यापासून आता गटबाजीदेखील बिग बॉस मराठीमध्ये बघायला मिळत आहे. त्यातच, माघील आठवड्यात, घरच्या कॅप्टनसाठी एका टास्कचे आयोजन केले होते.
त्यामध्ये, उत्कर्ष आणि मीरा दोघेही आमने सामने होते. त्यात उत्कर्ष विजयी ठरला, मात्र तरीही मीरा आणि त्याचा गट अजूनही अबाधित आहे.त्यामुळे, ते मिळून पुढे कसे खेळावे याची आखणी करत होते. त्यावेळी, उत्कर्ष आणि मीरा दोघेही घरातील सदस्यांबद्दल बोलत होते. कोण आपल्याकडून खेळू शकतो, आणि कोणाच्या आपल्याकडे येण्याने फायदा आहे.
कोणाला टारगेट करून, बायकॉट करायचं हे सगळं ते दोघे ठरवत होते. त्यावेळी, शिवलीलाला आपल्ल्याकडे घ्यायचा का? असा मुद्दा पुढे आला. त्यावेळी, लोकप्रिय कीर्तनकार शिवलीला पाटीलबद्दल बोलत असताना, उत्कर्ष शिंदेची जी’भ घ’सरली. तो म्हणाला,’नाही, ती अजिबात कामाची नाहीये. तिला आपलं डोकं नाहीये. तिला काय खेळावं, कस खेळावं हे कळत नाही.
नुसतं कोणीही माऊली- माऊली म्हणलं, की ती स्वतःला देवी समजते. तिला वाटत तीच माऊली आहे, तीच देवी आहे.’ त्याच हे बोलणं ऐकून, मीरा आणि तो स्वतः दोघेही कुत्सितपणे हसले. हा सर्व प्रकार, सहाजिकच बिग बॉसच्या कॅमेरामध्ये कैद झाला. हे सर्व बघून नेटकरी मात्र, उत्कर्ष शिंदेंवर चांगलेच संतापले आहे.
‘शिंदेशाही म्हणत तू स्वतःला कोण समजत आहेस,’ असं एकान कमेंट केलं.’शिवलीला ताईंनी बिग बॉसमध्ये जायला पाहिजे होत की नाही हा वेगळा प्रश्न आहे. मात्र वारकरी संप्रदायामध्ये, सर्वच जण एकमेकांना माऊली म्हणतात. म्हणून काय सगळेच स्वतःला देव समजतात का? उत्कर्ष तुझं बोलणं पूर्णपणे चुकीचे आहे.’ असं एका नेटकाऱ्याने कमेंट केलं आहे.
शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे, अनेकांनी त्यांच्यावर टी’का देखील केली. मात्र, बिग बॉसच्या घरात देखील त्यांचा साधेपणा, शांत स्वभाव आणि मर्यादा सांभाळून सर्वाना उत्तर देण्याचे कौशल्य यामुळे त्यांचा चाहतावर्ग निर्माण होत असलेला बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे, उत्कर्ष शिंदेच्या या वक्तव्यामुळे सगळीकडेच त्याच्यावर जोरदार टी’का होत आहे. ‘याने शिंदेशाहीच नाव खराब केलं,’ असं देखील एका नेटकऱ्याने लिहले आहे.