काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून काम मागणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीने काम मिळत नसल्यमुळे सुरु केला ‘हा’ उद्योग…

या को’रोनाकाळात, जगभरातील मोठमोठाल्या उद्योगपती, मीडिया हाऊस थोडक्यात सर्वांचेच आर्थिक गणित पार कोलमडून टाकले आहे. सर्वसामान्यांपासून ते सर्वच स्तरातील मोठाल्या लोकांना देखील याची चांगलीच झळ बसलेली बघायला मिळत आहे. अनेक लोकं बेरोजगार झाले तर काही लोकांचे सुरु असलेले संपूर्ण काम बुडीत निघाले.
हाताला काम नाही आणि त्यात वाढणारी महागाई यामुळे सर्वच जनता त्रस्त आहे. या भी’षण प’रिस्थि’तीला मनोरंजन विश्व देखील अपवाद नाहीये. अनेक हिंदी, मराठी, दक्षिण कलाकार बेरोजगार झाले असून त्याच्याजवळचे पैसे देखील संपले असल्याचे त्यांनी स्वतः सुद्धा आपल्या सोशल मीडियावरुन सांगितले होते.
हिंदी सिनेसृष्टीमधील शगुफ्ता अली यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याकडचे पैसे संपले असल्याचे सांगितले होते. तेव्हा रोहित शेट्टी आणि इतर काही कलाकारांनी देखील पुढे येऊन त्याची मदत केली होती. त्याचबरोबर नुकतंच अभिनेत्री सविता यांनी देखील आपली आर्थिक अडचण सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली होती.
असे अनेक कलाकार आहेत जे काम नाही आणि आर्थिक स्थिती कोलमडली आहे म्हणून आता छोटा-मोठा उद्योगधंदा करत आहेत. काही दिवसांपूर्वी मिर्झापूर स्टार पापड आणि लाडू विकत असलेले आपल्याला बघायला मिळाले होते. आता असच काही एका मराठी अभिनेत्रींच्या बाबतीत देखील समोर आले आहे. बालक पालक या सिनेमामधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शाश्वती पिंपळकरला कामच मिळत नाहीये.
याबद्दल काही दिवसांपूर्वी तिने एक पोस्ट टाकली होत. आपल्याकडे आता काम नाही, तेव्हा कोणी काम असेल तर देता का अशा आशयाची पोस्ट तिने आपल्या सोशल मीडियावर टाकली होती. मात्र तिच्या या पोस्टची दखल कोणीच घेतली नाही आणि म्हणून आता तिने स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरु केला आहे.
बालक पालक या सिनेमापुर्वी देखील शाश्वतीने काही छोट-मोठं काम केलं होतं. पण बालक पालक या सिनेमामधून तीला ओळख मिळाली. त्यानंतर चाहूल, योलो, हेडलाईन्स सारख्या प्रोजेक्ट्समध्ये तिने काम केलं. मात्र आता तिला कामासाठी चांगलेच फिरावं लागत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं. एखादा सिनेमा, मराठी मालिका किंवा वेबसिरीज कोणत्याही पप्रोजेक्ट मध्ये काम मिळेल का, असं आपल्या पोस्टमध्ये तिने लिहले होते.
पण त्याला काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून अखेर तिने उद्योग करायचा निर्णय घेतला आहे. इंटेरियर डिझायनर आणि फोटोग्राफर राजेंद्र करमरकर सोबत तिने डिसेंबर २०२० मध्ये लग्न केला आणि पुण्याच्या कोथरूड मधेच स्थायिक झाली. तिचा हा बिझनेस देखील तिने याच भागात सुरु केला आहे. ‘मुदपाकखाना’ नावाचा खाद्यपदार्थांचा बिझनेस आता शाश्वतीने सुरु केला आहे.
एखादा घरगुती कार्यक्रम किंवा पार्टी असेल तर त्यांच्या साठी पदार्थांचे आणि जेवणाचे ऑर्डर मुदपाकखाना कडून घेण्यात येत आहे. येत्या ३१ जुलै पासून तिचा हा बिझनेस सुरु होत असून, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज असं विविध पराकारचे पदार्थ याच्या मेनूमध्ये असणार आहेत. शनिवार रविवार खास मेनू असेल असं तिने सांगितलं आहे.