काय सांगता ! ५५ वर्षीय मकरंद देशपांडे यांची पत्नी आहे स्वतःपेक्षा २० वर्षांनी लहान तरुणी, फोटो पाहून चकित व्हाल…

मनोरंजन
आपल्या देशामध्ये असे खूप कमी कलाकार आहेत, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक भाषेत काम केले आहे. यामध्ये खास करुन, अनेक मराठी कलाकारांचे नाव समोर येते. सयाजी शिंदे, शिवाजी साटम, सचिन खेडेकर,महेश मांजरेकर या मराठी कलाकारांनी, मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू अशा सर्व भाषांमधील सिनेमामध्ये काम केले आहे.
त्यामुळे केवळ बॉलीवूडच नाही तर टॉलीवूडमध्ये देखील त्यांचा भाला मोठा चाहतावर्ग आहे. अशाच काही अभिनेत्यांपैकी आहेत मकरंद देशपांडे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळी, कन्नड अशा सर्व भाषांच्या सिनेमामध्ये मकरंद देशपांडेने काम केले आहे. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. अनेक मराठी सिनेमामध्ये त्यांनी काम केले होते.
एक रात्र मंतरलेली, समांतर, दगडी चाळ, पन्हाळा अशा मराठी सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे. तर सरफरोश, स्वदेस, मकडी, यासारख्या सुपरहिट सिनेमामध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच कौतुकाची दाद मिळवली होती. सोबतच,जलसा, एक निरंजन, लिसा, यासारख्या साऊथच्या सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
पुरी जगन्नाथ यांचा आगामी सिनेमा लायगर मध्ये देखील त्यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. हा सिनेमा जवळपास सर्वच भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. मकरंद देशपांडे यांच्या वैयक्तित आयुष्याबद्दल कधीच जास्त चर्चा झाली नाही. काही वर्षांपूर्वी मात्र, त्यांच्या खाजगी आयुष्याची जोरदार चर्चा रंगली होती. लय भारी सिनेमा फेम अदिती पोहनकरची बहीण आणि प्रसिद्ध लेखिका निवेदिता पोहनकर आणि मकरंद एकमेकांसोबत नात्यात असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
मकरंद देशपांडे यांचे यापूर्वी कधीही, कोणासोबत अ’फेअरच्या चर्चा रंगल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांच्याबद्दल ही चर्चा सर्वांसाठीच नवी होती. सर्वाना ध’क्का तर तेव्हा बसला जेव्हा निवेदिताचे वय समजले. निवेदिता, मकरंद पेक्षा जवळपास २२ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यादोघांच्या नात्यावर तेव्हा जोरदार टी’का देखील केली गेली होती.
मात्र, २०१५ मधेच त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या. त्यांचे लग्न झाले की नाही, याबद्दल कोणालाही ठाऊक नव्हते. पण नुकतंच, निवेदिताने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यावरून त्या दोघांचं लग्न झाले असावे असा कयास लावला जात आहे. ‘घरात तर चुकीला अजिबातच माफी नाही,’ असं कॅप्शन टाकत निवेदिताने मकरंद देशपांडेचा एक फोटो शेअर केला आहे.
तिच्या या फोटोवर अनेक वेगवेगळे कमेंट्स आले आहे. मकरंद देशपांडे आणि निवेदिता यांच्या वयामध्ये जरी अंतर असले तरीही, म्हणतात ना प्रेमामध्ये केवळ प्रेम महत्वाचे असते,बाकी सर्व नगण्य आहे. असच प्रेम त्यादोघांमध्ये बघायला मिळते. सोशल मीडियावर देखील काही वेळेस हे दोघे आपले फोटोज शेअर करत असतात, त्यामध्ये त्यांच्यातील प्रेमाची चुणूक नक्कीच जाणवते.
त्यांच्या लग्नाबद्दल अनेकजन सांगतात की, त्यांनी एका मंदिरात गुपचूप लग्न उरकले होते. त्याचे काही फोटोज देखील एका, मीडियाने शेअर केले होते. मात्र त्या फोटोंमध्ये कुठेही त्यांनी वरमाला किंवा इतर लग्नाचा पेहराव नसल्याने प्रेक्षक चांगलेच बुचकळ्यात पडले होते.