काय सांगता ! संजय जाधवने ‘हेअर ट्रान्सप्लांट’साठी खर्च केले तब्बल एवढे लाख रुपये, वाचून चकित व्हाल..

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असते, तसेच आपल्याला समाजात सुंदर असणे फार महत्वाचे समजले जाते. त्यासाठी अनेक तरुण तरुणी सुंदर दिसण्यासाठी नाना प्रकारचे उपाय करून चुकलेले असतात. पण दिसण्यात फरक मात्र पडत नाही. पण पैसा असेल तर आज सगळ्या गोष्टी शक्य आहे.
आज कित्येक बॉलिवूड सेलेब्रिटी आहेत ज्यांनी स’र्जरी केल्यामुळे ते आज सुंदर दिसत, स’र्जरी करणाऱ्यांमध्ये, प्रियांका चोपडा,श्रुती हसन, जान्हवी कपूर, सारा अली खान, मौनी राय, त्याचबरोबर सलमान खान देखील तरुण दिसण्यासाठी स’र्जरीचा सहारा घेतो.
दरम्यान, सलमान खानची हिरोईन आयशा टाकियाने देखील स’र्जरी केली होती, पण तिची सर्जरी फेल गेल्यामुळे आज तिच्या दिसण्यात खूप मोठा बदल झाला आहे. आणि यामुळे ती बॉलिवूडपासून दूर झाल्याचे सांगितले जाते, पण यात आपले मराठी कलाकार देखील काही मागे नाहीत.
चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत चमकायचं असेल तर लुक्स आणि सौंदर्य यावर देखील लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी आपलं तारुण्य टिकवण्यासाठी प्लास्टिक स’र्जरी, हेअर ट्रान्सप्लान्ट यांसारख्या पर्यायांचा आधार घेतात.
अशा स’र्जरी करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता मराठी दिग्दर्शक, अभिनेता संजय जाधवचं नाव देखील जोडलं गेलं आहे. त्याने देखील आपलं टक्कल लपवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट करून घेतलं. आज संजयचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्याने आपल्या डोक्यावर केस लावण्यासाठी किती लाखांचा खर्च केला.
संजयने केवळ डोक्याच्या वरच्या भागापुरतेच केस लावले आहेत. गरज पडल्यास त्याला ते कृत्रिम केस काढताही येतात. संजयच्या या नव्या लुकमुळे त्याच्यामध्ये बराच फरक जाणवतोय. त्याचा हा नवा लुक लक्ष वेधणारा आहे यात शंका नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या या नव्या लुकसाठी संजयनं जवळपास 25 लाख रुपये खर्च केले आहेत.
हेअर ट्रान्सप्लान्ट स’र्जरीसाठी तो खास अमेरिकेत गेला होता असं म्हटलं जातं. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी या नव्या लुकसह त्याने सर्वांनाच चकित केलं होतं.
हेअर ट्रान्सप्लान्ट कसं केलं जातं?
हेअर ट्रान्सप्लान्ट या सर्जरीला मराठीत केस प्रत्यारोपण असंही म्हटलं जातं. या प्रक्रियेत मानेच्या मागच्या बाजूचे केस काढून त्यांची सूक्ष्मदुर्बिणीखाली तपासणी केली जाते. यातील योग्य केसांचे तुकडे करून एक एक करत डोक्यावर प्रत्यारोपण केले जाते. प्रत्यारोपणासाठी 3 लाख ते 50 लाखांपर्यंतचा खर्च येतो. हा खर्च डॉक्टर आणि रुग्णालयानुसार कमी जास्त प्रणात होतो. एका संशोधनानुसार भारतात महिन्याला सुमारे 100 लोक केस प्रत्यारोपण करून घेतात.