काय सांगता ! पहिल्यांदाच कंगनाने हात जोडून महाराष्ट्र सरकारला केली ‘ही’ विनंती…

आपल्याला माहित आहे की कंगना राणौत ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँ’गस्ट’र’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही.
आपल्या वा’दग्र’स्त वक्तव्यामुळे नेहमी च’र्चेत असणारी कंगना काही दिवसांपासून सोशल मीडियापासून लांब आणि शांत होती. तिने नेहमी सोशल मीडियावर राजकारण आणि बॉलिवूडबद्दल वा’दग्र’स्त वक्तव्य केले आहेत.
सु’शांत सिं’ग राजपूतच्या नि’धनानंतर ती अचानक च’र्चेत आली आणि तिने बॉलिवूडच्या नेपोटीझ्मबद्दल अनेक वा’दग्र’स्त विधाने केली. पण तरीही तिच्या वाटेला कुणी गेले नाही. दरम्यान, राज्यातील राजकारणातही तिने हस्तक्षेप करून महाविकास आघाडीच्या सरकारला धारेवर धरले होते त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणत ट्रोल देखील करण्यात आले होते.
अनेक जण तिला बीजेपीची दलाल म्ह्णून संबोधतात. पण अजूनही एखाद्या विषयावर मत मांडण्याची संधी कंगना सोडत नाही. तिने केलेल्या काही आ’क्षेपा’र्ह व’क्तव्यांमुळेच ट्विटरने कंगनाच्या अकाउंटवर बंदी देखील आणली होती. आता कंगनाने महाराष्ट्र सरकारला राज्यातील थिएटर्स उघडण्याची विनंती केली आहे.
क’रो’नाच्या दुसऱ्या ला’टेमुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन लागला आणि सिनेमागृहे बंद करण्यात आली. राज्यातील क’रोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे सिनेमागृहे पुन्हा उघडण्याची मागणी होऊ लागली आहे. हीच संधी साधून कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केली आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ” महाराष्ट्रातील क’रो’नाची रु’ग्णसं’ख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील सिनेमागृहे सुरु करून चित्रपटसृष्टी आणि चित्रपट उद्योगांना उभारी द्यावी, ही महाराष्ट्र सरकारला विनंती.”, असे लिहून त्याखाली हात जोडणारे ईमोजी देखील टाकले आहेत. हिंदी मल्टिप्लेक्सने ‘थलायवी’ हा चित्रपट दाखवावा अशी इंस्टाग्राम स्टोरीदेखील कंगनाने टाकली आहे. या स्टोरीमध्ये तिने पीव्हीआर आणि आयनॉक्स या सिनेमागृहांच्या ऑफिशिअल अकाउंट्सना टॅग केलं आहे.
कंगनाचा ‘थलायवी’ हा आगामी चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य नेत्या जयललिता यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ आणि तेलगू भाषेतील थलायवी चित्रपट सिंगल स्क्रीन सोबतच मल्टिप्लेक्समध्ये देखील दाखवला जाणार आहे.
परंतु हिंदी भाषेतील या चित्रपटासाठी फक्त सिंगल स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. थलायवीचा हिंदी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात यावा, यासाठी चित्रपट निर्मात्यांची बोलणी सुरु आहेत. थलायवी या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे.
तर दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ए.एल.विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून शैलेश सिंग आणि विष्णू इंदुरी निर्माते आहेत. जयललिथा यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.