करियर फ्लॉप तरीही एखाद्या राज्यासारखे जीवन जगतोय ‘मोहब्बते’ चित्रपटातील’ हा’ अभिनेता, करतो ‘हे’ काम..

मनोरंजन
बॉलीवूड मध्ये रोज नवीन चेहरे येतात. त्यापैकी काही खूप कमाल करतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. बॉलीवूड मध्ये अभिनय करुन एक सेलेब्रिटी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असत. त्यापैकी काहींना संधी मिळते, मात्र सर्वच कलाकारांना या संधीचे सोन करता येत नाही.
जर तुमच्यात काही कौशल्य असेल तरच तुम्ही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निमार्ण करू शकतात. मात्र काही कलाकारांच्या अंगी कौशल्य आणि दिसण्यात सुंदर असूनही त्याच्या पदरी निराशाच येते. त्यातील अशाच एका अभिनेत्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्ध होऊनही हा कलाकार अचानक बॉलिवूडमधून गायब झाला..
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटानंतर फार प्रसिद्धी मिळाली. पण नंतर ते इंडस्ट्रीतून एकाएकी गायब झाले. जुगल हंसराज हा देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. आज जुगलचा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊया ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज सध्या करतोय तरी काय? त्याचं बॉलिवूड करिअर सुपरफ्लॉप आहे. मात्र तरी देखील तो एक आलिशान आयुष्य जगत आहे.
जुगलनं 1983 साली ‘मासूम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये त्याने एका बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘पापा कहते हैं’ या चित्रपटात हिरो म्हणून पहिल्यांदा त्याने काम केलं. पुढे सुलतान, लोहा, आ गले लग जा, कर्मा यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्याने लहानमोठ्या भूमिका साकारल्या.
2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहबत्तें’ या चित्रपटामुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. या चित्रपटात त्याने एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. मात्र या मल्टिस्टारर चित्रपटानंतर त्याने कोणताच हिट चित्रपट दिला नाही.
2002 मध्ये त्याने ‘प्यार तुम्ही से कर बैठे’ या चित्रपटात भूमिका साकारली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर जुगलने खूप मोठा ब्रेक घेतला. 2010 मध्ये ‘प्यार इम्पॉसिबल’मध्ये तो झळकला. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटानंतर जुगलने अभिनय क्षेत्राला रामराम केलं.
2014 मध्ये त्याने गर्लफ्रेंड जास्मिनशी ऑकलँडमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय व मोजका मित्रपरिवार उपस्थित होता. जुगल सध्या करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करतो. क्रिएटिव्ह टीममध्ये तो काम करतो. तो उत्तम लेखन करतो. करण आणि जुगल एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
करणच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या शीर्षकगीतातील ओळी जुगलने लिहिल्या होत्या. जुगलची पत्नी जास्मिन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत न्यूयॉर्कमध्येच राहातो. शिवाय त्याची स्वत:ची काही रेस्तरॉ देखील आहे. यामधून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर त्याने आपली आलिशान लाईफस्टाईल मेंटेन केली आहे.