कधीकाळी अमिताभ बच्चन, रणबीर कपूरसोबत केले होते काम, आज रस्त्यावर ‘मोमोज’ विकून भरतेय पोट..

कोणाचे नशीब हे कधी फिरणार हे सांगता येत नाही. एखादा रस्त्यावरचा माणूस रातोरात लखपती होऊन जातो. तर एखादा श्रीमंत माणूस हा रस्त्यावर येतो. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. मात्र, एखाद्याच काम गेल्यावर त्याच्या आयुष्याला येणाऱ्या वे’दना या खूप मोठ्या असतात. गेल्या दीड वर्षापासून को’रोना म’हामा’री मुळे अनेकांचे काम गेले आहे.
यामुळे त्यांना रस्त्यावर हवे ते काम करून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. याचा फटका कंपन्यातील काम करणाऱ्या लोकांना सर्वाधिक बसलेला आहे. को’रोना काळात लॉक डाऊन लागला आणि अनेक कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे कंपनीत कामगारांना नोकरी गमवावी लागली. कामगारांसह बॉलिवूडला देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.
तसेच मराठी चित्रपट सृष्टी व मालिका यांना देखील याचा फटका बसला आहे. अनेक जुनिअर आर्टिस्ट, कलाकार यांना रोजगार मिळत नसल्याने उ’पासमा’रीची वेळ देखील आलेली आहे. मराठीतील अनेक जूनियर कलाकारांसाठी दिग्गज अभिनेते प्रशांत दामले, अशोक सराफ यांनी मध्यंतरी मदतीची घोषणा केली होती आणि त्यांनी या कलाकारांना मदत देखील मिळवून दिली होती.
राज्यामध्ये को’रोना ची दुसरी लाट आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मालिकांचे चित्रीकरण सुरू झालेले आहे. मात्र, बॉलीवूड मध्ये हवे तसे काम अजूनही सुरू नाही. बॉलीवूड मध्ये सर्व चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजही प्रदर्शित होत आहेत. नुकत्याच झालेल्या ईदला सलमान खान याचा राधे द मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
मात्र, हा चित्रपट ओटी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला होता. त्यामुळे या चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळाला नाही. आता बॉलिवूडमध्ये देखील काम करणारे अनिल ज्युनियर आर्टिस्ट बेरोजगार होऊ लागले आहेत. त्यांना पैशाची चणचण भासत आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी या कलाकारांना मदत देखील दिली आहे.
यातच एक जुनिअर आर्टिस्ट होती. तिचे नाव ‘सुचिस्मिता रोत्र्या’ असे आहे. सुचिस्मिता आसाम मधील कटक शहरात राहणारी आहे. 2015 मध्ये ती मुंबईला आली होती. त्यानंतर तिने जवळपास सहा वर्ष बॉलिवूडमध्ये काम केले. ती असिस्टंट कॅमेरामन होती. तिने अमिताभ बच्चन, रणवीर कपूर आलिया भट्ट यांच्यासह सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबत देखील काम केले.
अनेक आठवणी देखील तिने नुकताच शेअर केले आहे. मात्र, को’रो’ना म’हामा’री मुळे लागलेल्या लॉक डाऊन च्या काळामध्ये तिला काम मिळेनासे झाले. तिने आपली कैफियत अमिताभ बच्चन यांच्याकडे देखील मांडली होती. अमिताभ बच्चन यांनी तिला काही मदत केली आणि गावाकडे पाठवले. आता सुचिस्मिता ही आसामच्या कटक शहरामध्ये रस्त्याच्या कडेला मेमोज विकत आहे.
दिवसाकाठी मला चारशे रुपये मिळतात, असे तिने सांगितले आहे. माझ्या वडिलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे घरातील मी एकमेव कमावती आहे. त्यामुळे मला मेमोज विकून उदरनिर्वाह करावा लागतो, असे ती म्हणाली. मात्र, ज्या वेळेस मला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये संधी मिळेल त्या वेळेस मी बॉलिवूडमध्ये परत जाईल, असेही सूचिस्मिता सांगितले.