एकेकाळी उदरनिर्वाहासाठी पेट्रोल पँपावर कॉफी विकायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आज आहे कोट्यवधीची मालकीण..

एकेकाळी उदरनिर्वाहासाठी पेट्रोल पँपावर कॉफी विकायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आज आहे कोट्यवधीची मालकीण..

मनोरंजन

आज आपण बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटीज आयुष्य बघतो. त्यांचे अगदी राजेशाही आणि चंदेरी आयुष्य बघून आपणही तसे आयुष्य जगावे अशी इच्छा सर्वसामान्यांच्या मनात एकदा तरी नक्कीच येते. त्यांचे आयुष्य बघता सर्व काही त्यांच्यासाठी किती सोपे आहे असे आपल्याला वाटते.

मात्र ते सध्याच्या पदावर आहेत किंवा सध्या त्याचे आयुष्य उपभोगत आहे त्यासाठी त्यांनी मोठा खडतर प्रवास केला होता, हेदेखील तेवढेच मोठे सत्य आहे. अनेक सेलिब्रिटीज पूर्वी सर्वसामान्यांचे आयुष्य जगत असताना, मोठा संघर्ष करत आज एक सेलिब्रिटीची आयुष्य जगत आहेत. त्यांचे आयुष्य बघता स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतात अशी आशा आपल्या देखील मनात निर्माण होते.

त्यांना बघून अनेक जण यशस्वी आयुष्य जगण्याचे स्वप्न बघतात आणि त्यादृष्टीने पावले देखील उचलतात. यामध्ये काही यशस्वी होतात तर, काहींच्या पदरी अपयश येते. मात्र सतत संघर्ष नक्कीच जीवनात यश मिळवून देते, असे आपल्याला अनेक सेलिब्रिटीजच्या संघर्ष यात्रेतून पाहायला मिळाले. नवाजुद्दीन सिद्दिकी, इरफान खान यासारख्या अभिनेत्यांना सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला.

मात्र आज जागतिक स्तरावर त्यांची ओळख आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्या बॉलिवूडमध्ये आपण पाहिले आहेत. काही सेलिब्रिटीजचा संघर्ष पुढे येतो, मात्र काही सेलिब्रिटीजचा संघर्ष कधीच पुढे येत नाही. त्यापैकीच एक आहेत शबाना आझमी. बॉलीवूड मधील मोठ्या नावांपैकी एक शबाना आजमी यांचं नाव आहे.

आपल्या निरागस चेहर्याने आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आज त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. शबाना आझमी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये काही कमर्शियल सिनेमा होते तर काही हटके सिनेमा देखील त्यांनी केले आहेत. त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या चहात्यापर्यंत माहिती पोहोचावी यासाठी त्यांची आई शौकत यांनी एक आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे.

‘कैसी ऍड आय मेमोयर’ या आत्मचरित्र मध्ये शबाना आझमी यांच्या आयुष्यातील अनेक रंजक कथा सांगितल्या आहेत. शबाना आझमी या प्रसिद्ध कवि कैफी आझमी यंचू मुलगी असल्यामुळे त्यांचे बालपण कलात्मक वातावरणातच गेले. त्यांचे वडील कवी तर आई थेटर मध्ये अभिनेत्री होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच अभिनयाच्या क्षेत्राकडे शबाना अजून यांचा कल होता.

त्यांची आई शौकत यांनी शबानाच्या अभिनय प्रतिभेला सकारात्मक वळण दिले आणि शबाना आझमी यांनी चित्रपटांमध्ये पाऊल टाकले. पारंपारिक मुस्लिम कुटुंबातील असून देखील शबाना आझमी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक बो’ल्ड भूमिका साकारल्या. त्यामुळे जागतिक स्तरावर कायमच त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले आहे.

त्यांच्या आत्मचरित्रातील एक किस्सा अगदी सर्वसामान्य लोकान सारखाच आहे. क्या किस्सा बद्दल सांगताना शौकत लिहितात की, ‘ शबाना ला नेहमी वाटायचे की, मी बाबा वर म्हणजेच शबाना च्या धाकट्या भावावर तिच्या पेक्षा जास्त प्रेम करते. एक दिवस नाश्ता करत असताना, शबानाच्या प्लेट मधून एक टोस्ट मी बाबाला दिले.

आमच्या मेडला दुसरा टोस्ट घेउन ये असे सांगेपर्यंत शबाना तिथून उठून गेली, आणि बाथरूम मध्ये जाऊन एकटीच रडत होती. तिला मी काही बोलेल तेवढ्यात तिची शाळेची बस आली, आणि ती निघून गेली. आई म्हणून त्या वेळी मला सहाजिकच खूप वाईट वाटले. दोन्ही मुलांवर नेहमीचे काही सारखेच प्रेम करत असते.सकाळी झालेल्या या किस्यामुळे, शबाना इतकी जास्त उदास झाली होती की शाळेतील प्रयोगशाळेमध्ये तिने कॉ’पर स’ल्फेट खा’ल्ले.

मी तिच्या पेक्षा जास्त बाबावर प्रेम करते, म्हणून तिने असे केले असे तिची चांगली मैत्रीण अपर्णा मला म्हणाली होती. हे ऐकून मला नै’रा’श्याने ग्रा’सले आणि मी तिच्या पुढे हात टेकले.’ शबानाने त्यानंतर पुन्हा एकदा लहानपणी आ’त्मह’त्याचा प्रयत्‍न केला होता. याबद्दल देखील शौकत यांनी पुस्तकात लिहिले आहे, ‘ज्यावेळी तिच्या असभ्य वर्तन यामुळे कठोर पावले उचलत मी तिला घर सोडण्यास सांगितले.

तेव्हा मला समजले की, ग्रँड रोड वरील रेल्वे स्टेशन वर तिने ट्रेन समोर उ’डी मा’रण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तिच्या शाळेचा शिपाई तिथे हजर होता म्हणून त्यांनी तिला वा’चव’ले. मात्र त्यावेळी देखील मी चांगलीच अस्व’स्थ झाले होते. शबानाला नक्की कसे सांभाळावे हे मला समजतच नव्हते.’ शौकत यांनी पुढे लिहिले आहे की शबाना सुरुवातीपासूनच एक स्वाभिमानी मुलगी होती.

त्यांना नेहमीच स्वतःच्या पायावर उभे राहून वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. त्याच सोबत कुटुंबाला मदत करण्यासाठी पैसे कमवण्याचा विचारदेखील त्याच्या मनात वयाच्या आधीच आला होता. त्यासाठी सिनियर केंब्रिजमध्ये प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या आधी शबाना यांनी पेट्रोल पंपावर तीन महिने ब्रू कॉफी विकण्याचे काम देखील केले.

या कामातून रोज अवघ्या तीस रुपये मिळत होते. याबद्दल शबाना यांनी काम पूर्ण होईपर्यंत घरी कोणाला सांगितले नाही. 3 महिन्यानंतर आपल्या आईच्या हातात पैसे ठेवले, त्यावेळी शौकत यांना शबनाने घेतलेल्या कष्टा बद्दल समजले. हे समजताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे ठाकले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *