एकेकाळी हॉटनेस मध्ये नंबर एकला असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने अचानक निवडला अध्यात्मचा मार्ग, होती इमरान हाश्मीची फेव्हरेट अभिनेत्री…

वर्ष २००८ मध्ये आलेला चीत्रपट हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गै-रव-र्तन केल्याचा सनसनाटी आणि ध-क्कादा-यक आ-रोप या अभिनेत्रीने २०१८ मध्ये केला होता. याचवेळी ती सर्वाधिक चर्चेत आली होती.
मात्र 2008 ते 2018 या दहा वर्षांच्या काळात ती कुठे गायब झाली. ती काय करत होती. तिने चित्रपट करायचे का सोडले याचा कुणालाही फारसा पत्ता नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दहा वर्षात हि अभिनेत्री नेमके कुठे होती.
या अभिनेत्रीचे नाव आहे तनुश्री दत्ता. वर्ष २००३ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने या चित्रपटामधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाला आणि तनुश्रीच्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंत केले.
यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीड अशा विविध चित्रपटामध्ये ती दिसली होती. मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळाले नाही. हे सिनेमा पूर्णपणे तों-डावर पडले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट चित्रपटात तनुश्री प्रेक्षकांना अखेरची दिसली होती.
करियरमध्ये मिळणारं अपयश तनुश्रीला पचवता आले नाही. ती यामुळे नि-राश झाली आणि याच नै-रा-श्यातून ती डि-प्रे-शनमध्ये कधी गेली हे तिचे तिला कळाले नाही. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने त्यावेळी आध्यात्माचा मार्ग स्विकारला. या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला.
बराच काळ तिने कोईम्बतूर इथल्या जग्गी वासुदेव या आश्रमात घालवला. लडाख यात्रेदरम्यान तिने केशवपनही केले होते. एका मुलाखतीमध्ये तिने आपला लडाखमधील अनुभवसुद्धा शेअर केला आहे. बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये सरळ साध्या सोप्या श्वा-सोच्छवास करण्याने खूप आराम मिळाल्याचे तिने या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितले होते.
नै-रा-श्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फा-यदेशीर ठरल्याचेही तिने सांगितले आहे. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतर काही वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेसुद्धा तनुश्री आणि आध्यात्माचा सं-बंध कायम राहिला. ती एक सेलिब्रिटी असल्याने तिथल्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केले जात होते. पण सध्या कोरना सुरु व्हायच्या आधीच ती भारतात परतली आहे.
आता तनुश्री पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा चित्रपटात पुनरागमन करत आहेत. फिरोज नाडियाडवाला यांच्या येणाऱ्या वेब सीरिजमध्ये नाना अभिनय करताना दिसतील अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या या पुनरागमनावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मोठा सं-ताप व्यक्त केला आहे.
नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात. असा सवाल तिने केला आहे. ती म्हणाली आहे की नाना पाटेकर यांनी मला प्रचंड मा-नसिक त्रा-स दिला आहे. त्यांच्यामुळेच माझे फिल्मी करिअर संपले. काही वर्ष मी नै-राश्ये-त देखील होते. स्त्रियांचा अनादर करणाऱ्या या व्यक्तीला बॉलिवूडमध्ये पुन्हा काम देऊ नये.
निर्मात्यांनी नाना पाटेकर यांना अजिबात पाठिंबा देऊ नये. या देशातील लोक सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रशासन व्यवस्थेशी लढत आहेत. परंतु मला मात्र कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. असे आ-रोप करत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे.