एकेकाळी क्रिकेटपट्टूचे घरात टॉयलेट देखील नव्हते, IPL मध्ये 37 चेंढुत शतक करून भारतीय टीम मध्ये मिळवली आहे जागा…

टीम इंडिया मध्ये असे अनेक क्रिकेटपट्टू येत आणि जात असतात. काही क्रिकेटप्ट्टू असे आहेत की ज्यांनी टीम मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कधीच टीममधून बाहेर काढले गेले नाही. त्यांचे खेळाचे बळावर आज देखील भारतीय टीम उच्च स्थानावर जाऊन पोहचली आहे.
आज टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा याचे बद्धल आपण जाणून घेणार आहोत. गुजरातमधील वडोदरा येथे 17 नोव्हेंबर 1982 रोजी जन्मलेला युसुफने नुकताच त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला आहे. युसुफचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता.
गरीबी अशी होती की युसूफच्या घरी शौचालय देखील बांधलेले नव्हते. टी -20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात युसूफला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीमुळे युसूफ या सामन्यात सलामीला आला होता. पठाण आपल्या पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो.
आयपीएलच्या पहिल्याच सत्रात युसूफ पठाणने अवघ्या 37 चेंडूत मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकले होते. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचे पहिले सत्र खेळणार्या युसूफ पठाणने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. या मोसमात युसुफने 435 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने संघासाठी अनेक सामने जिंकणारे डावदेखील खेळले. आयपीएलमधील युसूफची चांगली कामगिरी पाहून त्याला भारतीय वनडे आणि टी -20 संघात खेळण्याची संधी मिळाली.
पठाणने भारताकडून 41 एकदिवसीय आणि 18 टी -20 सामने खेळले आहेत. 2011 च्या विश्वचषक संघात युसुफ पठाणही भारतीय संघाचा सदस्य होता. पठाणने आपल्या कारकीर्दीत 41 एकदिवसीय सामन्यात 810 धावा केल्या. ज्यात त्याचे नावावर 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
युसुफ पठाणनेही भारताकडून 18 टी -20 डावात 236 धावा केल्या. सन 2013 मध्ये युसूफने मुंबईस्थित फिजिओथेरपिस्ट आफरीनशी लग्न केले. त्या दोघांनाही एक मुलगा आहे. युसुफ पठाण आणि इरफान पठाण यांनी मिळून क्रिकेट अकॅडमी देखील उघडली आहे.
इरफान मुळे मला ओळख मिळाली, युसुफ :- युसुफने एका मुलाखतीत सांगितले की, इरफानमुळे त्याला ओळख मिळाली. तो म्हणाला होता की त्याच्या (इरफान) कारणामुळेच मीसुद्धा प्रसिद्ध झालो आणि माझे नाव जगप्रसिद्ध केले.
मी जेव्हा घरगुती क्रिकेट खेळायचो तेव्हा लोक मला इरफान चा भाऊ म्हणून ओळखत होते. त्याचा भाऊ म्हणून ओळखल्याबद्दल मला नेहमीच अभिमान वाटतो. एक प्रकारे, आम्ही पुन्हा बडोद्याला क्रिकेटच्या टीममध्ये पुन्हा जागा मिळाली. आता बडोदा इरफान पठाणशी जोडलेला दिसतो.