ऋतुराजच्या दमदार खेळीमुळे ‘या’ मराठी अभिनेत्रीवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव, ‘म्हणे, आज तुमचे हे चांगले खेळले…’

मनोरंजन
सध्या सगळीकडेच आयपीएलच्या सामन्यांची चर्चा सुरु आहे. सुरु झालेले सामने, को’रो’नाच्या वा’ढत्या प्रा’दुर्भावामुळे मधेच बंद करण्यात आले होते. त्यानंतर, दीर्घ प्रतीक्षेनंतर आता हे सामने पुन्हा सुरु झाले आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएलच्या मोसमात, अनेक अटीतटीचे सामने बघितले गेले. यावर्षी अनेक संघानी अनपेक्षित आणि खास खेळी केली.
रॉयल चॅलेंजर्स अर्थात बंगलोरच्या संघाने, यंदाच्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये आपले सर्वोत्तम प्रदर्शन दिले. सगळीकडेच यंदाच्या वर्षी आरसीबीच्या संघाने चर्चा रंगवली. मात्र, कालच्या सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आणि, ट्रॉफी जिंकन्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले. माघील वर्षी, चेन्नई सुपर किंग्सचे प्रदर्शन निराशाजनक होते.
पण यंदाच्या वर्षी, चेन्नईच्या संघाने खूपच उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे सीएसकेचे फॅन्स प्रचंड खुश आहेत. नुकतंच चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये फायनलमध्ये प्रवेश कारण्यासाठी सामना खेळण्यात आला. अटीतटीच्या या सामन्यामध्ये, चेन्नईने डेल्ल्ली कॅपिटल्सचा ४ विकेट्सने पराभव केला आणि आयपीएलच्या फायनल सामन्यांमध्ये प्रवेश केला.
ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा दोघांच्या भागीदारीमुळे, चेन्नईच्या संघासाठी विजयाच्या वाटा मोकळ्या झाल्या. ऋतुराज गायकवाडने यंदाच्या, आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच दमदार खेळी केली आहे. आपल्या तुफान फलंदाजीने त्याने सगळीकडेच चर्चा रंगवली आहे. विजय चेन्नई सुपर किंग्स संघाचा ठरला आणि चाहत्यांनी शुभेच्छा मात्र अभिनेत्री सायली संजीवला दिल्या.
माघील बऱ्याच काळापासून, ऋतुराज आणि सायली या दोघांच्या अ’फेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सायलीने, आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ऋतुराजने तिच्या या फोटोवर व्वा असं कमेंट केलं होत. त्या कमेंटला रिप्ल्या देत, सायलीने देखील हार्ट ईमोजी टाकलं होत. त्यामुळे, या दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे गेलं आहे असे अनेकाना वाटतं आहे.
मात्र त्यानंतर काही दिवसांनी, ऋतुराजने आपले आणि सायलीचे अफेअर किंवा मैत्रीच्या पुढे काहीही नाही असं स्पष्ट केले होते. त्यावर सायलीने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. म्हणून त्यांचे नाते, नक्की काय आहे याचे कोडे अद्यापही कायम आहे. असे असले तरीही, चाहत्यांनी मात्र सायलीच्या एका पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सायलीने, आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरून एक व्हिडियो शेअर केला.
साधारण लूकमध्ये, सायलीने या व्हिडियोमध्ये आपले नवीन कानातले दाखवले आहेत. मात्र, अनेकांनी तिच्या कानातल्यांचे नाही तर, ऋतुराज गायकवाडचे कौतुक तिच्या कमेंट बॉक्स मध्ये केल्याचे बघायला मिळाले. ‘तुमचे हे खूप छान खेळले,’ असं एका नेटकाऱ्याने कमेंट केले आहे.
‘सायलीदीदी, तुमचे कानातले नक्कीच ऋतुराजला आवडतील बर,’असं देखील एका नेटकऱ्याने कमेंट केले आहे. ‘ऋतुराज, नाम तो सुना ही होगा,’ असं एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. दरम्यान, सायलीने यावर काहीही उत्तर न देता, शांत राहून मौन धारण केले आहे.