‘इंडियन आयडॉल’मधील सायली कांबळेला ‘या’ दिगग्ज मराठी दिग्दर्शकाने दिली गायनाची संधी…

‘इंडियन आयडॉल’मधील सायली कांबळेला ‘या’ दिगग्ज मराठी दिग्दर्शकाने दिली गायनाची संधी…

सध्या आपल्या देशात अनेक रियालिटी शोज सुरु आहेत. त्यापैकी काही शो खूप जुने आहेत, तर काही नवीन देखील आहेत. काही शोज सुरु होऊन लगेच बंद देखील पडले. मात्र काही रियालिटी शोज आजसुद्धा प्रेक्षकांच्या मनात आपली जागा बनवून आहेत. अशाच शोज मध्ये एक आहे देशातील सर्वात पहिला रियालिटी शो, इंडियन आयडॉल.

आपल्या देशातील केवळ संगीत क्षेत्रातीलच नाही, तर मनोरंजन जगातील पहिला रियालिटी शो म्हणून इंडियन आयडॉलची ओळख आहे. अनेक, गायकांना या शोने संधी मिळवून दिली आहे. अभिजीत सावंत या शोच्या पहिल्या सत्राचा विजेता होता. अभिजित सावंतला जरी जास्त यश मिळाले नसले तरीही इतर अनेक गायकांना, इंडियन आयडॉलने संधी उपलब्ध करुन दिली आहे.

सध्याची सर्वात लोकप्रिय गायिका नेहा कक्करने देखील आपल्या करियरची सुरुवात याच शोमधून केली होती. यावर्षी या शोचा सीजन सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. टीआरपी साठी काय काय हतखंडे मेकर्स वापरतात, काय काय करतात या सर्व बाबी उघडकीस आल्या आणि शोच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला.

मात्र तरीही या शोमध्ये उत्तम गायक-गायिका आहेत, हे सत्य कोणीही झुगारु शकत नाही. या सिजनमध्ये मराठमोळ्या सायली कांबळेची सगळीकडेच चर्चा रंगली होती. इंडियन आयडॉलने सायलीने एक ओळख मिळवून दिली. तिच्या गाण्याची खास शैली आज घराघरात पोहोचली आहे.

सुरेल गायकी आणि त्याच बरोबर मनात बसणार सुंदर आवाज, सुरांवर योग्य पकड यामुळे सायली कांबळेचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. इंडियन आयडॉल १२चे पर्व संपले आणि लगेच सायलीला सिनेसृष्टीमधे काम करण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. जो राजन यांच्या कोल्हापूर डायरीज या मराठी चित्रपटासाठी तिने एक गाणं गायलं आहे.

यावर सायली म्हणाली,’मला विश्वासच बसत नाहीये की हे सर्व खरोखर होत आहे. अजूनही एखाद स्वप्नच मी बघत आहे असं मला वाटत आहे. लहानपानापासून माझं स्वप्न होत मी एक उत्तम गायिका बनाव, लोकांनी मला ओळखावं. आणि यासाठीच मी इंडियन आयडॉल मध्ये सहभाग नोंदवला होता. सीजन संपताच काम मिळणं, माझ्यासाठी मोठं सौभाग्य आहे.’

या सिनेमाच संगीत अवधूत गुप्तेनी दिल आहे. सायलीला शो संपताच गाण्याची संधी देण्याबाबत अवधूत म्हणाले की,’सीजन सुरु झाल्यापासूनच दिग्दर्शक जो राजन, सायलीच्या गायकीचे चाहते झाले होते. तिची गायकी आहे सुद्धा तशीच उत्तम. त्यांनीच मला तिचे नाव सुचवले. तिचे गाणे बघून मी देखील तिला संधी देण्यास होकार दिला.

सायलीने खूपच उत्तम प्रकारे हे गाणं गायलं आहे. चाहत्यांना ते नक्कीच आवडेल यावर माझा विश्वास आहे.’ इतके दिवस रियालिटी शोमध्ये सायलीचे गाणे ऐकलेच आहे, आता सिनेमामध्ये तिचे गाणे ऐकायला मिळणार यासाठी तिचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. सीनेसृष्टीमधे कोल्हापूर डायरीज या सिनेमाने सायलीच्या करियरचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.