आशुतोष पत्कीसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानने दिली प्रतिक्रिया, म्हणाली; मी लग्न करेल पण मला….!

आशुतोष पत्कीसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानने दिली प्रतिक्रिया, म्हणाली; मी लग्न करेल पण मला….!

मराठी झेंडा सिनेमामध्ये इवल्याश्या रोल मध्ये झळकलेली तेजश्री कधी महाराष्ट्रातील अवघ्या सासूबाईंची लाडकी सुनबाई झाली हे समजलच नाही. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमधून तिने टेलिव्हिजन च्या दुनियेत प्रवेश केले. या मालिकेमधील जान्हवी सर्वांना इतकी आवडली होती की, प्रत्येक सासू आपल्याला अशीच सून मिळावी असे स्वप्न बघू लागली.

जान्हवी म्हणून प्रसिद्ध झालेली तेजश्री अजून एका कारणासाठी चांगलीच प्रसिद्ध झाली होती आणि ते म्हणजे तिचं आणि श्री उर्फ शशांक केतकर या दोघांचं नातं. या मालिकेदरम्यान त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी लग्न देखील केले. त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. मात्र, त्या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि काहीच दिवसात ते दोघे वेगळे झाले.

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेहमीच चांगलीच चर्चा रंगवली. ‘होणार सून’ या मालिकेने देखील भरपूर कौतुक आणि प्रसिद्धी तिला दिली. तिच्या आणि बबड्या म्हणजेच आशुतोष या दोघांची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर या दोघांमध्ये काही तरी शिजत आहे अश्या देखील कुजबुज ऐकायला मिळत होत्या.

मात्र त्याबद्दल कोणीही, कधीच उघडपणे बोलले नाही. मात्र आता खरंच तसं आहे का असा प्रश्न, चाहत्यांना पडला आहे. तेजश्रीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशुतोषने तिच्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो लिहतो, ‘माझी प्रिय मैत्रीण, मला तुला हे सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूप खास आहे.

तू दिलेल्या प्रोत्साहानाबद्दल, तुझ्या पाठींब्याबद्दल आणि मला एक चांगला माणूस व अभिनेता बनण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल खूप आभार. तुझ्या वाढदिवसानिमित्ताने खास 2 टिप्स : तू भूतकाळ विसरून जा, कारण तो बदलता येत नाही…आणि दुसरं म्हणजे तुझ्या वाढदिवसाची भेट, जी मी आणलीच नाहीय… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’.

आशुतोषच्या या प्रेमळ पोस्टला तेजश्रीने देखील तेवढेच प्रेमळ उत्तर दिले आहे,‘मी एक गोष्ट विसरेन, पण ‘भेट’ नाही. नाहीच!, तुला माझ्यासाठी गिफ्ट आणावंच लागेल. तुझ्या या खास पोस्टसाठी खूप खूप आभार!’ आशुतोष तेजश्री च्या संवादामुळे सर्वच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून सगळीकडे हीच चर्चा सुरु आहे. म्हणून ते दोघे डेट करत आहेत का अश्या चर्चा सुरू असताना त्यावर कधीच तेजश्री काही बोलली नाही.

मात्र आता पहिल्यांदा तिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शूटिंगच्या वेळीसुद्धा आमच्यात अ’फेअर सुरु असल्याच्या चर्चा व्हायच्या. त्यामुळे आता रंगत असलेल्या चर्चामध्ये तसेही काही नवीन नाही. आशुतोष आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. एकत्र काम केल्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आमच्यात मैत्रीपलिकडे जशा चर्चा रंगत आहेत तसे काहीही नाही,’ असे तिने म्हटले आहे.

पुन्हा लग्न कधी करणार याबद्दल तिला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,’हो नक्कीच मला लग्न करायला आवडेलच. मात्र लग्न करण्यासाठी मला समजून घेणारा जोडीदार मला हवा आहे. तो सिनेसृष्टीतला असला तरीही चालेल. माझ्या चॉईसनुसार मुलगा मिळाला तर पुढच्या काही महिन्यातच लग्न करुन आयुष्याची नवीन सुरुवात करेन’. शुभ्रा- बबड्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं होत. म्हणून या दोघांची जोडी पुन्हा एकदा भेटीला येणार आणि ते देखील रुपेरी पडद्यावर असे सांगितले जात आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.