आलियामुळं करण जोहर झाला पिता? Father’s Day निमित्त केला ‘हा’ गजब खुलासा…!

आलियामुळं करण जोहर झाला पिता? Father’s Day निमित्त केला ‘हा’ गजब खुलासा…!

आज सगळीकडे पितृदिवस म्हणजेच फादर्स डे साजरा होत आहे. सोशल मीडियावर, जवळपास सर्वच नेटकरी आपल्या वडिलांना, आपआपल्या वेगळ्या आणि हटके पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. त्यामध्ये बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज देखील चांगलेच अग्रेसर आहेत. आपल्या वडिलांना, वेगळ्या आणि हटके पद्धतीने हे बॉलीवूडकर शुभेच्छा देत आहेत.

सोनम कपूरने, आपल्या वडिलांचा म्हणजेच अनिल कपूर चा एक जुना व्हिडियो शेअर करत तुम्हीच आयुष्य जगायचे शिकवले अशी पोस्ट केली आहे. अनुष्का शर्मा ने आपल्या वडिलांचा आणि आपल्या नवऱ्याचा म्हणजेच विराटचा फोटो शेअर करत, जगातील सगळ्यात भारी वडील असे आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे.

सारा अली खान हिने देखील आपल्या सैफ अली खान साठी पोस्ट शेअर केली आहे. मात्र या सर्वात, करन जोहरच्या पोस्ट सगळिकेच वाय’रल होत आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसे तर करन जोहर, बॉलिवूडचा सर्वात चर्चेत राहणारा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याचे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील जवळपास सर्वच कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत.

जवळपास संपूर्ण बॉलीवूडचं त्याचे फ्रेंड्स आहेत, मात्र काही खास जण त्याचे अगदी जवळचे मित्र आहेत. भट्ट कुटुंबासोबत देखील त्याचे खूप चांगले संबंध आहेत. सुरुवातीपासूनच महेश भट्ट, पूजा भट्ट यांच्यासोबत करचे ऋणानुबंध आहेत. तो आलिया भट्ट ला आपली मुलगी मानतो. त्याचे आणि आलियाचे नाते इतके जास्त घट्ट आहे की, त्यामुळेच त्याने आलियाला बॉलिवूडमध्येही ब्रेक दिला होता.

आलियाच्या करिअरची मोठी जबाबदारी करनने उचलली आणि त्यासाठी त्याने तिला बॉलीवूड मध्ये चांगलाच जम बसावा यासाठी नेहमीच प्रयत्न देखील केले आहेत. आलिया आजही त्याच्याच निरिक्षणाखाली काम करते. तर तो तिला मार्गदर्शन करतो. अलिया त्याला आपल्या गॉडफादर मानते. अनेकवेळा काही अवॉर्ड शो मध्ये आणि काही चॅटशो मध्ये देखील आलियाने याबद्दल बोलले आहे.

ज्यावेळी, राजी सिनेमासाठी आलियाला अवॉर्ड मिळाला होता तेव्हा आलियाने अत्यंत भावुक होऊन त्याला थँक यु म्हणले होते. त्यावेळी करन देखील चांगलाच भावुक झाला होता. आज करनने पितृदिनाच्या निमित्ताने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये करनने लिहिलं आहे, ‘माझी लहान मुलगी आलिया,तुझ्यामुळेच माझ्या पितृत्वाची पहिली सुरुवात.

खूप प्रेम.’ असं लिहत त्याने आलियाला देखील टॅग केलं आहे. करनला स्वतःची दोन लहान मुलं आहेत. २०१७ मध्ये या दोघांचा जन्म झाला होता. तो एक सिंगल डॅड आहे, त्याने कधीच विवाह केला नव्हता.मात्र, स’रो’गेसीच्या मदतीने त्याने दोन मुलांना जन्म दिला आहे. आणि आता खप आनंदाने सिंगल पिता बनून तो दोन्ही मुलांचा त्यांचा सांभाळ करत आहे.

यश आणि रूही अशी त्याच्या मुलांची नावं असून ते दोघेही जुळे मुलं आहेत. यश आणि ऋषी दोघेही आता ४ वर्षांचे झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकदा करन त्यांचे फोटो शेअर करत असतो. तर अनेकदा आलिया देखील त्यांच्यासोबत खेळताना दिसते.या दोघांनी माझे विश्वच बदलून टाकले आहे असे अनेक वेळा करन जोहर ने बोलले आहे.

२०१२ साली आलियाने करणच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.आणि हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. त्यानंतरही आलियाने करणच्या अनेक चित्रपटांत काम केलं होतं. सध्या आलिया बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *