आर्थिक अडचणीत सापडलेल्या आपल्या अभिनेत्रीबद्दल सचिन पिळगांवकरांची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले; जेव्हा तुमच्याकडे पैसे असता…

आर्थिक अडचणीत सापडलेल्या आपल्या अभिनेत्रीबद्दल सचिन पिळगांवकरांची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले; जेव्हा तुमच्याकडे पैसे असता…

बॉलीवूड हे क्षेत्र असे आहे की, तिथे मृगजळ या मागे धावणारे लोक अनेक असतात. ज्याची चलती आहे, त्याला बॉलिवूडमध्ये भाव असतो. एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपट करणे सोडले किंवा त्याला चित्रपट मिळत नसतील, तर त्याला कालांतराने कोणीही विचारत नाही.

बॉलिवूडमध्ये आपण असे अनेक उदाहरण पाहिले आहेत. आयुष्याच्या शेवटी त्यांना हा’लाखीचे जीवन जगावे लागते. उतारवयात त्यांना कुटुंबीय साथ देत नाही. तसेच आ’र्थिक अ’चणींना सामोरे जावे लागते. उपचारासाठी देखील पै’से मिळत नाहीत.

नुकताच अभिनेत्री शगुफ्ता अली नंतर ‘नदिया के पार’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज यांनीसुद्धा आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचा खुलासा केला होता. को’रोना म’हामा’री आणि त्यानंतर आलेलं आजारपण यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं होतं.

तसेच त्यांनी म्हटलं होतं, की त्यांच्याजवळ असलेली सर्व मिळकत आत्ता संपली आहे, इथून पुढे उदरनिर्वाह करनं कठीण आहे. सविता बजाज यांनी अभिनेता सचिन पिळगांवकरांसोबत ‘नदीया के पार’ चित्रपटात काम केलं होतं. अशातचं आत्ता अभिनेता सचिन यांनी सविता यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी इंडिया टाइम्ससोबत संवाद साधला आहे, यादरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘नुकताच मी वृत्तपत्रामध्ये सविता यांच्याबद्दल वाचलं. मला वाटतं की एसोसिएशनच्या लोकांनी पुढ येऊन कलाकार आणि टेक्नीशियन्सची मदत करावी. जर तुम्ही IPMPPA आणि CINTAA कडे मदत मागितला तर ते नक्कीचं तुमची मदत करतील. यासाठी तुम्ही त्यांचे सदस्यचं असणं आवश्यक नाही’.

जेव्हा सचिन यांना सांगण्यात आलं, की CINTAA ने सविता यांना मदत केली आहे, तेव्हा ते पुढे म्हणाले, ‘हे पाहा दोन गोष्टी असतात. पहिली ही की CINTAA जवळ कोणतीही गोष्ट आलेली नाहीय. आणि दुसरी म्हणजे लोक सेविंग का नाही करत? दुसऱ्यांकडे बोट करणं सोपं असतं.

मात्र लोक हे विसरतात त्यावेळी उरलेली चार बोटे आपल्याकडे असतात. मी कोणत्याही कलाकारावर आ’रोप करत नाहीय. मात्र आयुष्यात कोणतीही वाईट वेळ सांगून येत नाही. त्यामुळे सेविंग ठेवायला हवी’. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सविता बजाज यांनी आपल्यावर आलेल्या आर्थिक संकटाचा खुलासा केला होता.

शिवाय असंही म्हटलं होतं की, ‘त्यांनी 25 वर्षांपूर्वी आपल्या शहरात म्हणजेच दिल्लीत परत जायचं ठरवलं होतं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी ठेवून घेण्यास नकार दिला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी खूप पै’सा मिळवला, खूप लोकांना मदत केली आहे. आत्ता स्वतः चं स्वतः चा सांभाळ कर म्हणत त्यांची साथ सोडून दिली होती. मात्र त्या म्हणाल्या की आत्ता वेळ अशी आहे की मलाच मदतीची गरज आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *