आर्ची’ची बॉलिवूडमध्ये धडाक्यात एन्ट्री, ‘या’ दिग्गज कलाकारासोबत करणार बॉलिवूडमध्ये डेब्यु…

आपल्याला माहित असेलच कि रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तसेच तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले आणि तिच्या यशाची गाडी रुळावर लागली त्यानंतर मात्र आर्चीने मागे वळून पहिले नाही.
पण आता चर्चा आहे ती आर्चीच्या नवीन येणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांबाबदल. होय हे खरं आहे लवकरचं आपल्या सर्वांची लाडकी आर्ची बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कि ती कोणत्या चित्रपटांद्वारे आपल्याला भेटायला येणार आहे.
सैराट’ सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. रिंकू राजगुरू ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज’ या चित्रपटात दिसणार आहे. या लघुपटांमध्ये लॉ’कडाऊनमधील नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे.
पाच हिंदी लघुपट असलेला ‘अनपॉज’चा ट्रेलर लाँच होताच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट आज १८ डिसेंबरला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटांचे प्रमोशन वेळी आर्चीने अनेक गोष्टीचा उलघडा केला आहे.
तिला या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते कि, तुझ्या ‘अनपॉज’ या चित्रपटाविषयी काय सांगशील? तेव्हा ती म्हणाली की या चित्रपटात लॉकडाऊनमध्ये घडलेल्या पाच गोष्टी आहेत. मी जिची व्यक्तीरेखा केली आहे ती चित्रपटसृष्टीमध्ये काम करू इच्छिते. घरच्यांशी भां’डून तिला या क्षेत्रात नाव कमवायचं आहे.
अचानक लॉकडाऊन आल्याने मग मुंबईत एकटी कशी राहणार? तिच्याकडे तेवढे पै’सेही नसतात. मात्र, आता कसं सगळं सांभाळायचं या विचारात असतानाच तिची एका जवळच राहणाऱ्या वयस्कर महिलेशी ओळख होते. तिच्याशी मैत्री होते. त्या दोघींचं कसं जमतं हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
तसेच तिला या चित्रपटांमधून काय शिकायला मिळाले यावर देखील तिने भाष्य करताना म्हटले कि मी खुप गोष्टी शिकले. माझा आत्तापर्यंतचा प्रवास बघता माझा वेगवेगळया कलाकारांसोबत संपर्क आला. त्यांच्याकडून मी माझ्यात बदल घडवून आणणाऱ्या अनेक गोष्टी शिकले. अनपॉजच्या टीमसोबत घालवलेला वेळ तर कायम लक्षात राहण्यासारखा आहे.
खुप मोठी माणसं आणि त्यांची शिकवण मला माणूस म्हणून मोठं करणारी आहे. तसेच ती पुढे म्हणाली कि सेटवर काम करताना खुप मज्जा आली. खरंतर तेव्हा खुप भारी वाटत होतं. सेटवर लॉकडाऊन आणि कोरोनामुळे सगळेच जण खुप काळजी घ्यायचे. सेट सॅनिटाइज करणं, सगळयांची तपासणी, मास्क वापरायचे या सगळयांमध्ये एक वेगळा अनुभव मिळाला.
सेटवर खुप कमी माणसं असायची. पण, तरीही प्रत्येक जण आपल्या कामाबाबतीत तेवढाच लक्षपूर्वक काम करत असत. तसेच तिला तिच्या प्रोजेक्टबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली कि मी प्रथम स्क्रिप्ट बघते. तसेच एकदा साकारलेले पात्र मी पुन्हा साकारत नाही. जसे की, प्रेक्षकांना आर्ची आवडली होती. पण, मला आर्चीसारखं पात्र पुन्हा करायचं नव्हतं.
वेगवेगळया भूमिका करायला मला खूप आवडतात. भूमिकांच्याबाबतीत प्रयोग करत राहणं मला आवडतं. तसेच बॉलीवूड डेब्यू बद्दल बोलताना ती म्हणाली कि मी यासाठी प्र’चंड उत्सुक आहे. बॉलीवूड मुळे मला वेगवेगळया भूमिका करता येतील. माझ्यातील क्षमता आजमावून बघता येतील.
प्रेक्षकांनाही मला नव्या रूपात बघायला आवडेल. बॉलिवूडचं हे नवं जग मला बघायचंय अर्थात आता लवकरच आपल्याला आपली लाडकी आर्ची बॉलीवूड मध्ये काम करताना दिसणार आहे आणि आपण एवढीच अपेक्षा करू कि एक मराठी अभिनेत्रीं म्हणून तिने बॉलीवूडमध्ये भरपूर नाव कमवावे.