‘आभाळमाया’ फेम सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक..

‘आभाळमाया’ फेम सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक..

मराठी चित्रपटसृष्टीदेखील आता चांगलीच मोठी झाली आहे. यामध्ये अनेक कलाकार एकमेकांशी कोणत्या न कोणत्या नात्याने जुळलेले देखील आहेत. मात्र त्यांच्या बिझी शेड्युल मधून आपल्या कुटुंबासाठीच काही वेळ त्यांना काढता येतो. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला फारसं काही माहित नसतं.

त्यामुळे एखादा कलाकार, दुसऱ्याचा नातेसंबंध आहे याचा खुलासा देखील खूप उशिरा होतो. तसे तर या चित्रपटसृष्टीमध्ये रोज नवीन नाते बनतात. मात्र काही नातेएकदा जुळतात आणि जन्मभराची साठी मिळते. मनातून जोडल्या गेलेल्या नात्याची किंमत काही खास असते. जे नाते मनातून जोडले जाते, ते कधीही तुटत नाही असं म्हणलं जात.

आपण हे अनेकवेळा पाहिलं आणि अनुभवल देखील आहे. आणि अशी अनेक नाते चित्रपटसृष्टीमध्ये नकळतच बनतात. असेच एक नाते आहे सुकन्या कुलकर्णी आणि संजय जाधव या दोघांचे. होय प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव आणि सुकन्या कुलकर्णी या दोघांचे एक खास नातं आहे.

आभाळमाया या मालिकेच्या दरम्यान, संजय जाधव आणि सुकन्या कुलकर्णी यांची ओळख झाली. साधी झालेली ओळख, कधी एका घट्ट बहीण-भावांच्या नात्यामध्ये रूपांतरित झाले हे त्यादोघांना देखील नाही समजले. सुकन्या कुलकर्णी हे आज चित्रपटसृष्टीमधील एक मोठं नाव आहे. सुकन्या कुलकर्णीने सुरुवातीच्या काळात, अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

सुकन्या कुलकर्णी यांच्या निखळ आणि दिलखुलास हास्याचे अनेक चाहते आहेत. मात्र आभाळमाया या मालिकेने त्यांना, लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. याच मालिकेच्या वेळी, दिग्दर्शक विनय आपटे आर्थिक अडचणीत आलेले असताना, संजय जाधव यांनी निर्माता बनून त्यांचीही मदत केली होती. त्याच वेळी सुकन्या आणि संजय यांची ओळख झाली होती.

जेव्हा संजय आणि सुकन्या यांची भेट झाली तेव्हा राखी पौर्णिमा नुकतीच झाली होती. त्यामुळे सुकन्या यांनी संजय जाधवला राखी बांधली आणि त्यानंतर प्रत्येक राखी पौर्णिमा हे दोघे सोबतच साजरी करत आहेत. त्यानंतर त्या दोघांनी अनेकवेळा सोबत काम केलं आहे. आजही या दोघांचे नाते कायम आहे.

संजय जाधव हे उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि छायाचित्रणकार देखील आहेत. आई शपथ, सातच्या आत घरात चेकमेट, दुनियादारी असे सुपरहिट सिनेमा त्यांचे नावे आहेत. सुकन्या आणि संजय हे दोघे सक्खे भाऊ बहीण नाहीयेत. मात्र त्यांच्या नात्यामधील प्रेम आणि आपुलकी बघून ते दोघे सक्खे भाऊ बहीण नाही असं कोणीच म्हणू शकत नाही.

आभाळमाया या मालिकेनंतरच मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये, मालिकांचे सत्र खऱ्या अर्थाने सुरु झाले. या मालिकेने,मराठी टीव्ही इंडस्ट्रीला कलाटणी तर दिलीच; तर सुकन्या याना संजय जाधव हा एक भाऊ दिला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.