‘या’ प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने खाल्ला होता चक्क झाडूने मार, तिच्या ‘या’ सवयीमुळे तिला..

आपल्या आयुष्यात असे अनेक किस्से असतात ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. तर कधी घर सोडून जाण्याचे. कधी अचानक एखाद्या विचित्र घटनेला सामोरे जावं लागल्याचा किस्सा असे अनेक, भन्नाट किस्से असतात जे आपण कधीही विसरू शकत नाही.
प्रसंगी बघता त्यावेळी आपल्याला विचित्र आणि गं’भीर वाटणारी ती घटना जेव्हा काही वर्षानंतर आपण माघे वळून बघतो तेव्हा आपण त्यावर चांगलेच हसतो. सर्व सामान्यांसोबतच सेलेब्रिटीजच्या आयुष्यात देखील असे किस्से असतातच. कधी तरी एखाद्या मुलाखतीच्या वेळी हे सेलिब्रिटीज असंगी सहजपणे आपले असेच किस्से सांगतात आणि मग त्याबद्दल चांगलीच चर्चा रंगते.
नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील अशाच एका घटनेचा खुलासा केला आहे. प्राजक्ता माळी सुरुवातीपासूनच चर्चेतच राहिली आहे. मराठी सिनेसृष्टीमधली एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्राजक्ताने आपले नाव कमवले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर माघील जवळपास दोन दशकांपासून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे.
अनेक मराठी सिनेमा, मालिका आणि हिंदी मालिकांमध्ये देखील तिने काम केल आहे. २०११ साली ‘सुवासिनी’ या मालिकमधून प्राजक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने साकारलेल्या सावित्रीच्या भूमिकेने तिला घराघरात जागा मिळवून दिली. त्यानंतर तिने कधीच माघे वळून पहिले नाही आणि अनेक मालिकांमध्ये काम केले.
‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये तिने काम केलं. यामध्ये ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेत तिने ‘मेघा देसाई’ही व्यक्तिरेखेला साकारली होती आणि तिच्या उभा भूमिकेला प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली होती.आणि याच प्रसिद्धीच्या बळावर ‘खो-खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्येदेखील काम करण्याची तिला संधी मिळाली.
आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीमधे आपली जागा निर्माण करणाऱ्या प्राजक्ताने आता एका वेगळ्या आणि नवीन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. प्राजक्ताने आता स्वत:चा काव्यसंग्रह प्रकाशित केला. तिच्या या काव्यसंग्रहाचं नाव ‘प्राजक्तप्रभा’ असं आहे. या प्रकाशनसोहळ्याच्या वेळी तिने आपल्या आयुष्यातील एक अत्यंत थक्क करणारा किस्सा सांगितला.
तिच्या या लिखाणाच्या आवडीमुळे, प्राजक्ताला चक्क तिच्या आईचा झाडूने मार खावा लागला होता. दरम्यान, काही मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा काव्यसंग्राहाचा प्रकाशनसोहळा पार पडला. याच कार्यक्रमामध्ये आपल्या काव्यसंग्रहाबद्दल सांगताना तिने एक अत्यंत चकित करणारा किस्सा सांगितला. प्राजक्ता ११ वीमध्ये असतानाच हा किस्सा आहे.
लहानपणापासून तिला लिहिण्याची चांगलीच आवड होती. आणि म्हणूनच ती रोजनिशी देखील लिहायची. आणि तिची एक डायरी आईला गवसली. त्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या ज्या वाचून तिची आई चांगलीच संतापली. रागाच्या भरात तिने प्राजक्ताला चक्क झाडूने चांगलाच चोप दिला होता.आणि या प्रकारानंतर तिनं रोजनिशी लिहिणं पूर्णपणे थांबवलं.
किमान कुलूपबंद कपाट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत रोजनिशी लिहायची नाही असा तिने निर्धार केला होता. हा भन्नाट किस्सा सांगताना प्राजक्ताला स्वतःच हसू आवरतच नव्हतं. तिथे उपस्थितांमध्ये देखील, किस्सा ऐकताना एकंच हशा पिटली.