तडाखेबाज फलंदाज असतानाही टीम इंडियाने घरचा रस्ता दाखवलेला ‘हा’ खेळाडू ; आधी आमदार आणि आता थेट बनला ‘क्रीडामंत्री’..

भारत सध्या को’रो’ना म’हा’मारीच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करत आहे. त्याच दरम्यान, पश्चिम बंगालमधील वि’धानसभा नि’वडणूका मात्र मोठ्या धामधुमीत पार पडल्या. ह्या राज्यात एकूण २९४ जागांसाठी मतदान झाले होते. ही निवडणूक संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली.
मात्र, येथील २९४ जागांपैकी शिवपूर याम तदारसंघाची विशेष चर्चा होती. त्याचे कारण देखील तसेच खास होते. येथे मुख्यमंत्री म’मता बॅन’र्जींच्या तृणमूल काँ’ग्रेस पक्षाने माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांना मैदानात उतरवलं होतं आणि त्यांच्यावि’रोधात भाजपकडून येथे रतीन चक्रवर्ती यांना वि’धानसभेचं तिकीट मिळालं होतं.
मनोज तिवारी ह्यांच्यावर काही नि’वडणूक विशेष तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती. पण, या निव’डणुकीत मनोज तिवारी यांनी रतीन चक्रवर्तींचा तब्ब्ल ३२ हजार मतांनी पराभव केला. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या स’रकारमध्ये मनोज तिवारी यांना क्रीडा आणि युवक राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाले होते. भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. जोरदार प्रचारानंतर त्यांनी नि’वडणूक जिंकत आमदारकी मिळवली,आणि त्यानंतर आता त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळालं आहे.
मनोज तिवारी ह्यांची आयपीएल व क्रिकेट कारकीर्द
भारतीय संघांसाठी, मनोज ह्यांनी १२ एकदिवसीय तर ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्यांनी २८७ धावा जमवल्या आहेत. त्यामध्येही एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. १०४ ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.
तिवारी यांना ९८ आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये त्यांनी २८.७२ च्या सरासरीने १६९५ धावा जमवल्या. आयपीएलमध्ये त्यांचा सर्वाधिक स्कोर ७५ इतका आहे. कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांकडून आयपीएल मध्ये ते खेळले आहेत.
रणजी करंडकात केली होती चमकदार कामगिरी
मनोज तिवारी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप लहान आहे. मात्र २००६-०७ मध्ये रणजी करंडकातील त्यांचा पराक्रम कोणालादेखील विसरता येणार नाही. या करंडकात मनोज तिवारी यांनी ९९.५० च्या सरासरीने ७९६ धावा चोपल्या होत्या.
आणि याच कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघात देखील स्थान मिळालं आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची संघात निवड झाली. तथापि, सामन्याआधी ते दुखापतग्रस्त झाले होते आणि त्यानंतर त्यांना २००८ मध्ये भारतीय संघात संधी मिळाली.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही धुमाकूळ
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिवारी यांनी १२५ सामन्यांच्या १९६ डावांमध्ये ८९६५ धावा फटकावल्या आहेत. ३०३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर लिस्ट ए मधील 1१६३ सामन्यांमध्ये त्यांनी ५४६६ धावा जमवल्या आहेत. गोलंदाजीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३१ तर लिस्ट ए सामन्यांमध्ये ६० विकेट्सदेखील मिळवल्या आहेत.
एक क्रिकेटपटूच आता, युवा क्रीडामंत्री बनला आहे त्यामुळे बंगालमध्ये युवकांमध्ये एक उत्साह दिसत आहे. ह्या मिळालेल्या संधीचा मनोज कसा उपयोग करून बंगालच्या खेळाडूंना मदत करणार ह्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.