आजवर आपण जिला छोटी-मोठी अभिनेत्री समजत होतो ती निघाली शशांक केतकरची बहीण, पहा ‘या’ मालिकेत करतेय काम…

बॉलिवूड मधील कपूर कुटुंब, किंवा प्रसिद्ध खान कुटुंब.. त्याचबरोबर हिंदी टेलिव्हिजन मध्ये देखील डेलनाझ व बख्तियार, प्रसिद्ध रिद्धी डोगरा व अक्षय डोगरा सोबतच मराठी मधील मृन्मयी आणिगौतमी देशपांडे अश्या कित्येक भावा-बहिणीच्या जोडी आपण पहिल्या आहेत.
बऱ्याच वेळा आपण ह्या अभिनेता व अभिनेत्रीला बघूनच आपल्याला वाटायला लागते की, तो किंवा ती प्रसिद्ध कलाकारांची बहीण किंवा भाऊ आहे. मात्र, खूप वेळा आपल्या लक्षात देखील येत नाही, कारण त्यांची चेहरेपट्टी वेगळी असते…
होणार सून मी या घरची ह्या मालिकेने तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ह्यांना प्रेक्षकांच्या घराघरात पोहचवले. शशांक केतकर ला ह्या मालिकेद्वारे तूफान लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याने माघे वळूनच नाही पहिले आणि यशाची नवं-नवीन शिखर गाठतच राहिला. शशांकच्या लोकप्रियतेमुळे त्याला, खूप प्रसिद्धी मिळाली.
काही दिवसांपूर्वी, शशांक चे वैय’क्तिक आयुष्य घ’टस्फो’ट आणि इतर गोष्टींमुळे डि’स्टर्ब झालेले होते. पण त्याने दुसरा विवाह केला आणि पुन्हा त्याचे आयुष्य रुळावर आले. तेव्हापासून तो आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी गोष्टी आपल्या अकाउंट वरून शेअर करतो.
मात्र नुकतेच त्याने आपल्या बहिणीबद्दल एक पोस्ट शेअर केलीय आहे. शशांकची बहीण देखील अभिनेत्री बनून तुम्हाला मालिकेमधून भेटायला येत आहे हे तुम्हाला ठाऊक देखील नसेल. शशांकच्या लहान्या बहिणीचे नाव दीक्षा असे आहे. दीक्षा हि अतिशय उत्तम अशी कलाकार आहे.
नुकतंच तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. ‘तू सौभाग्यवती हो!’ या मालिकेत अभिनेत्री दीक्षा केतकर ‘ऐश्वर्या’ ही भूमिका साकारत आहे. दीक्षाने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं. त्याचबरोबर दीक्षाने बऱ्याच नाटकांमध्येही काम केले आहे.
तिने न्यूयॉर्क मध्ये जाऊन अभिनयाचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. शशांकने सो’शल मी’डियावर पोस्ट लिहित बहिणीच्या पदार्पणाचा आनंद व्यक्त केला होता. शशांक सध्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करतोय.
दीक्षा ने आपल्या अभिनयाने ह्या मालिकेमधून चांगलीच लोकप्रियता कमावली आहे. मराठी चित्रपट सृष्टीला शशांक आणि दीक्षा च्या रुपात, एक उत्तम अशी कलाकारांची जोडी मिळत आहे हे नक्की. ह्या भाव बहिणीच्या जोडीने, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अगदी तुफान लोकप्रियता प्राप्त करून आपले वेगळे आणि महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.