‘आई कुठे..’ मधील अरुंधतीचा खऱ्या आयुष्यातील अनिरुद्ध आहे perfect नवरा ! आहे ‘हा’ प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक..

मालिकांचे विश्व हे अगदी वेगळे असते, मात्र तरीही रसिकांना वेड लावणारे आणि आपल्या जवळचे वाटणारे असते. अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि आपली वेगळी खास अशी जागा निर्माण करतात. त्या मालिकेमधील पात्र देखील रसिकांच्या मनात घर करतात आणि तीच त्यांची ओळख बनून जाते.
अश्या अनेक मालिका आहेत, ज्यांनी आपल्या कथानकामुळे जोरदार लोकप्रियता मिळवली. अश्याच काही खास मालिकांपैकी एक आहे, सध्या सुरु असलेली ‘आई कुठं काय करते ही’ मालिका. या मालिकेने अल्पावधितच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील सर्वच पात्र, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
विशेष करुन प्रमुख पात्र, म्हणेजच अरुंधती.अगदी साधी-भोळ्या स्वभावाची एक गृहिणी, म्हणून अरुंधती हे पात्र अनेक महिलांना आपल्या जवळचे वाटते. त्यामुळे सध्या या मालिकेने चांगलीच लोकप्रियता कमावली आहे. अरुंधती म्हणेजच मधुराणी गोखले हिच्या आयुष्याबद्दल फार काही, प्रेक्षकांना माहित नव्हते, म्हणून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी, चाहते नेहमीच उत्सुक असतात.
मधुराणीने अनेक मराठी मालिकांमध्ये आणि काही मराठी सिनेमामध्ये देखील काम केले आहे. मात्र तेव्हा तिला त्यातून फारशी प्रसिद्धि मिळाली नाही. २००३ मध्ये तिने मराठी दिग्दर्शक ‘प्रमोद प्रभुळकर’ यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर लवकरच त्यांना एक गोंडस मुलगी देखील झाली. मुलीच्या जन्मानंतर मधुराणीने काही काळ, अभिनयापासून ब्रेक घेतला होता.
‘आई कुठं काय करते’ या मालिकेद्वारे तिने जवळपास १० वर्षांनी पडद्यावर पदार्पण केले आहे. तिचे पती प्रमोद प्रभुळकर यांनी ना मुख्यमंत्री गणप्या गावडे आणि युथटयूब सारखे मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी बार्वेकर आणि पौर्णिमा डे यांना अभिनयाचे धडे दिले आहेत. आपल्या यशाचे मोठे श्रेय त्या दोघी आपले मेंटॉर म्हणजेच प्रमोद यांना देतात.
मधुराणी आणि प्रमोद नेहमीच आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. मात्र त्यातून ते दोघे आपल्या कुटुंबासाठी वेगळा वेळ काढतातच. अनेकवेळा सोशल मीडियावर त्यांचे फोटोज ते दोघेही शेअर करत असतात. आपल्या रील लाईफमध्ये असणारा जोडीदार जरी परफेक्ट नसला, तरीही खऱ्या आयुष्यातील जोडीदार मात्र परफेक्टच आहे, असं मधुराणी सांगते.
दहा वर्ष अभिनयापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा या क्षेत्रात पदार्पण केलं असं विचारले असता मधुराणी सांगते की,’मला मालिकेचे कथानक आणि माझे पात्र खूप आवडले. माझी मुलगी आता मोठी झाली आहे, म्हणून आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये पुन्हा पदार्पण करण्याच्या विचारतच मी होते. तेव्हाच या मालिकेची ऑफर आली आणि मी स्वीकारली.’