‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवी एण्ट्री; दोघांमध्ये येणार तिसरा..पहा VIDEO..

मालिका म्हणलं की, त्यामध्ये अगदी रोमांचकारी वळण हे ठरलेलंच असतं. अनेकवेळा अश्या रोमांचकारी वळणावर, कधी-कधी मुख्य पत्राचा मृ’त्यू होतो तर कधी पात्रच बदलतं. कधी मुख्य अभिनेत्रीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येतो, तर कधी जुन्याच पात्राची प्लॅ’स्टिक स’र्जरी केली जाते.
असं अनेक वेगवगेळ्या, टर्न्स या मालिकांमधून आपल्याला बघायला मिळतच असतं. त्यात आता मराठी मालिका आघाडीवर आहेत. सध्या अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. दरम्यान, काही मराठी मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात देवमाणूस मालिका आघाडीवर होती.
या मालिकेचे कथानक अतिशय दमदार असल्याने खूप कमी कालावधीमध्ये ही मालिका लोप्रियेतेच्या शिखरावर पोहचली. या मालिकेतील प्रेत्यक पत्राने प्रेक्षकांवर भुरड घातली होती. अशातच आई कुठे काय करते ही मालिका देखील टीआरपीमध्ये आघाडीवर दिसायला मिळते. या मालिकेचे कथानक देखील वेगळ्या वळणावर आले आहे.
असाच एक मोठा बदल आता, स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेमध्ये होणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. या मालिकेमध्ये घडणाऱ्या घटनांच, नेहमीच जोरदार चर्चा रंगली जाते.
अरुंधतीने साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये संजनाच्या कानाखाली मारल्याची बातमी असेल किंवा अभिषेकने आपली बायको अंकिताला लगावलेली झापड असेल या दोन्ही घटनांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घ’टस्फो’ट झाला आहे.
लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यातच सध्या एका नवीन दमदार पात्राची एन्ट्री आता या मालिकेमध्ये होत आहे. त्यानंतर मालिकेत नवे रंजक वळण आले. संजना आणि अनिरुद्ध लग्नबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता एका नव्या बालकलाकाराची मालिकेत एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच संजना आणि अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले. अनेक अडचणींनंतर संजना आणि अनिरुद्ध एकत्र आले आहे. अप्पांनी घराचा अर्धा हिस्सा अरुंधतीच्या नावावर केल्यामुळे अरुंधती देखील देशमुख कुटुंबीयांसोबत राहताना दिसत आहेत. संजनामुळे घरात सतत वाद होत असतात. दरम्यान आता मालिकेत नवे वळण आले आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजनाच्या मुलाची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. निखिल हा संजना आणि शेखरचा मुलगा आहे. शेखर काही दिवसांसाठी निखिलला संजनाकडे आणून सोडतो. आता निखिलमुळे संजना आणि अनिरुद्धच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.