‘आई कुठे काय करते’ मालिका नवीन वळणावर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची होणार एन्ट्री, अरुंधतीने घेतला हा निर्णय..

मालिका म्हणलं की, त्यामध्ये अगदी रोमांचकारी वळण हे ठरलेलंच असतं. अनेकवेळा अश्या रोमांचकारी वळणावर, कधी-कधी मुख्य पत्राचा मृत्यू होतो तर कधी पात्रच बदलतं. कधी मुख्य अभिनेत्रीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येतो, तर कधी जुन्याच पात्राची प्लॅस्टिक सर्जरी केली जाते. असं अनेक वेगवगेळ्या, टर्न्स या मालिकांमधून आपल्याला बघायला मिळतच असतं.
असाच एक मोठा बदल आता, स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेमध्ये होणार आहे. आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. या मालिकेमध्ये घडणाऱ्या घटनांच, नेहमीच जोरदार चर्चा रंगली जाते. अरुंधतीने साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये संजनाच्या कानाखाली मारल्याची बातमी असेल किंवा अभिषेकने आपली बायको अंकिताला लगावलेली झापड असेल या दोन्ही घटनांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
अरुंधती आणि अनिरुद्ध या दोघांचा घ’टस्फो’ट होणार का? झाला तर कधी होणार? जणू हा प्रश्न सध्या राज्यातील घरा-घरांमध्ये एक मोठा मुद्दा आहे. त्यातच सध्या एका नवीन दमदार पात्राची एन्ट्री आता या मालिकेमध्ये होत आहे.
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या, शंतनू मोघे यांची लवकरच या मालिकेमध्ये एन्ट्री होत आहे. सध्या या मालिकेमध्ये, अरूंधती आणि अनिरूद्धच्या घ’टस्फो’टाला केवळ एक आठवडा आहे. अर्थातच हा घ’टस्फो’ट होणार कि नाही हे गुप्त असलं तरीही, आपण या घरातून जाण्याच्या अगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा अशी अरुंधतीची मनापासूनची इच्छा आहे.
सुनेलाच लेक समजून प्रेम देणाऱ्या अरुंधतीच्या सासूबाई म्हणेजच यशाच्या आजीने देखील याला परवानगी दिली आहे. अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. ‘समृद्धी’ बंगल्यात गौरी-यशच्या साखरपुड्याची जय्यत सुरू आहे. आणि याच सोहळ्यात एका नव्या पात्राची एन्ट्री होते.
आतापर्यंत कधीही न दाखवलेलं पात्र आता पहिल्यांदाच सगळ्यांसमोर येणार आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा म्हणजेच, अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एन्ट्री होत आहे. अनेकवेळा या न त्या कारणानं अविनाशचं नाव या मालिकेत दाखवण्यात आलं होत मात्र हा अविनाश नक्की कोण हे मालिकेत दाखवण्यात आलं नाही.
तेव्हा पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेता शंतनु मोघे याच अविनाश देशमुखचं पात्र साकारत आहे. अविनाश व अनिरूद्ध दोघे भाऊ, पंजा लावताना दिसत आहेत. अनिरूद्ध अविनाशला म्हणतो की,’मी जिंकलो तर काय देशील?’ त्यावर अविनाश म्हणतो,’तू मागशील ते.. आणि हरलास तर जे मी मागेन ते देखील?’
त्यावर अनिरूद्ध म्हणतो,’ते बघू नंतर…’ या दोघांमध्ये पंजा लावण्यात येतो. अविनाश अनिरूद्ध हरवतो… ठरल्याप्रमाणे अनिरूद्ध त्याला म्हणतो,’काय हवं ते माग?’ यानंतर अविनाश हात जोडून,’दादा या घरच्या लक्ष्मीला थांबवं.’ अविनाश आणि अनिरूद्ध यांच्या या संवादानंतर संपूर्ण देशमुख कुटुंब स्तब्ध होत.
अरूंधती आणि अनिरूद्ध यांचा घटस्फोट व्हावा अशी कोणाचीच इच्छा नाहीये. मात्र अरूंधतीने आता आपल्या मनाची तयारी केली आहे. आणि दुसरीकडे संजना तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. या सगळ्यात अनिरुद्धला देखील आपली चूक समजली असली तरीही अजूनही तो, मात्र ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही.