‘आई कुठे काय करते’ मधील ‘या’ लाडक्या अभिनेत्याने मालिकेला ठोकला रामराम ! कारण वाचून चकित व्हाल..

मनोरंजन
अलीकडच्या काळात, मराठी मालिकांची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक मराठी मालिकांचा टीआरपी, हिंदी मालिकांपेक्षाही जास्त आहे. या मराठी मालिका इतर भाषेत देखील बघितल्या जातात. माघील अनेक महिन्यांपासून, एका मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.
आई कुठं काय करते, या मालिकेने अल्पावधीतच भरगोस यश संपादन केले. सुरुवातीपासूनच या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. आई कुठं काय करते, या मालिकेतील सर्वच पात्र देखील प्रेक्षांच्या पसंतीस उतरली. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, अभिषेक, यश, गौरी, इशा यासगळ्यांसोबतच आई-आप्पाचे पात्र देखील लोकप्रिय ठरले.
आपला स्वाभिमान जपण्यासाठी, एक स्त्री किती सहजपणे मोठाले निर्णय घेऊ शकते, यावर आधारित ही मालिका आज, महाराष्टाच्या घराघरात पोहोचली आहे. सध्या या मालिकेत अतिशय रोमांचकारी असे वळण बघायला मिळत आहे. अरुंधतीने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय चुकीचा ठरला, तर देशमुख कुटुंब अक्षरशः रस्त्यावर येऊ शकते.
कारण मालिकेत अरुंधतीने, घराचा तिच्या नावावर असलेला हिस्सा गहाण ठेवला आहे. याबद्दल देशमुख कुटुंबाला समजले असून त्यांना खूप मोठा ध’क्का बसला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंब आता चिं’ताग्र’स्त आहे. गहाण ठेवलेला, घराचा भाग सोडवायचा कसा याबद्दलची चिंता देशमुख कुटुंबाला पडली आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये नेहमी आपल्या आईसोबत खंबीरपणे उभा राहणारा, तिचा लाडका यश कुठेच दिसत नाहीये.
काही कामानिमित्त यश बाहेरगावी जात असल्याचे, मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. तर, यश म्हणेजच अभिषेक देशमुख सध्या लंडनमध्ये धमाल मस्ती करत असल्याच बघायला मिळत आहे. होय, यश म्हणजेच अभिषेक देशमुख सुट्ट्यांसाठी लंडनला गेला आहे. आपल्या सोशल मीडियावर त्याने, लंडनचे काही फोटोज सुद्धा शेअर केले आहेत.
आता काही दिवस, अभिषेक मालिकेत दिसणार नाहीये. अनेकांना प्रश्न पडला होता, मालिकेचे कथानक सध्या, उत्कंठावर्धक अशा वळणावर असताना यश आपल्या आईला सोडून कसा जाऊ शकतो? तर आता, त्याच्या फोटोजवरून सर्वाना आपले उत्तर मिळाले आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, जस सर्वसामान्यांना एक ब्रेक हवा असतो, तसा तो कलाकारांना देखील हवा असतो.
म्हणून अभिषेक देशमुखने त्याच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढला असून आपल्या खऱ्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेला आहे. म्हणून अभिषेक त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. त्याच्या या निर्णयाने, त्याचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. ‘मालिका इतक्या जास्त रोमांचक वळणावर असताना, तू मालिकेतून एक्झिट का घेतली,’ असा प्रश्न देखील काही चाहत्यांनी त्याला विचारला आहे.
मात्र, काही चाहते त्याच्यासोबतच, लंडनच्या वेगवेगळ्या भागांचे दर्शन घेत आहेत. इंस्टाग्रामवर, अभिषेकने आपले अनेक फोटोज आणि व्हिडियोज शेअर केले आहेत. आई कुठं काय करते मधला सर्वांचा लाडका यश, त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील आपल्या कुटुंबात सर्वांचा लाडका असल्याचं या व्हिडियोज मध्ये बघायला मिळत आहे.