‘आई कुठे काय करते’मधील ‘ही’ अभिनेत्री पहिल्यांदाच झळकणार ‘या’ हिंदी मालिकेत..

कोणत्याही अभिनेत्रीने एखाद्या मालिकेतून पदार्पण केले तर, तीच तिची ओळख बनून जाते. अर्थातच ते पात्र तिने कसे रेखाटले आहे, यावरदेखील बरंच काही अवलंबून असते. या मालिकेचे कथानक आणि पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते तेव्हाच, त्या कलाकाराला प्रचंड लोकप्रियता मिळते.
असेच काही झाले अभिनेत्री अश्विनी महागडे बद्दल. सुरुवातीला अश्विनी महांगडेने काही मराठी सिनेमांमध्ये काम केले. मात्र त्यामधून तिला फारशी ओळख आणि दाद नाही मिळाली. बॉईज या मराठी सिनेमामध्ये देखील अश्विनी झळकली होती. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजेच रानु अक्काची भूमिका साकारली होती.
राणू आक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. आपल्या भावासाठी थेट दुश्मनाच्या छावणीत जाऊन राहणाऱ्या राणू अक्काच्या धाडस आणि शौर्याची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे अश्विनीने रेखाटली होती. त्यामुळे तिची लोकप्रियता इतकी जास्त वाढली होती की चाहत्यांनी अक्षरशः तिला डोक्यावर उचलून धरले होते. त्यानंतर तिने आई कुठे काय करते या मालिकेत अगदी साधारण मुलीची भूमिका साकारली.
सध्या आई कुठे काय करते ही मालिका टीआरपी मध्ये सर्वात पुढे आहे. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसे अश्विनीचे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. साध्या-सरळ अनघाचे चे पात्र अश्विनीने खूपच उत्तम प्रकारे रेखाटले आहे आणि त्यामुळे गायब झालेल्या अनघाचे पात्र पुन्हा आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहे.
अभिनयाच्या बाबतीत ती भल्या-भल्या कलाकारांना टक्कर देते. पात्र कोणतेही असो, त्यासोबत एकरुप होऊन ते रेखाटण्याची कला तिच्याकडे आहे. अश्विनी आता एका हिंदी मालिकेत देखील काम करत आहे. आपल्या कामाबद्दल ची माहिती तिने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन दिली आहे. सोनी टीव्हीच्या लोकप्रिय मालिकेत आता अश्विनी महांगडे झळकणार आहे.
आपला पहिला हिंदी प्रोजेक्ट असे म्हणत अश्विनीने आपला एक फोटो या पोस्ट वर शेअर केला आहे. मेरे साई या सोनी टीव्हीच्या मालिकेत अश्विनी तेजस्वीची भूमिका साकारत आहे. राणू अक्का सारख्या लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर आता हिंदीमध्ये देखील अश्विनीने आपल्या अभिनयाच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावर धडक मारली आहे. काही दिवसांपासून अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत दिसत नव्हती.
अभिषेकने ऐन साखरपुड्याच्या वेळी अनघाला सोडून, अंकिता सोबत लग्न केले. त्यानंतर, अंकिताने त्याला धोका दिल्याचे समोर आले आणि आता ते दोघे वेगळे होत आहेत. त्यामुळे आता पुन्हा आपली चूक स्वीकारून अभिषेक अनघाला आपल्या आयुष्यात परतण्याची विनंती करतो असं कथानक वळलं आहे. मात्र, एकदा धोका खावून, अनघा पुन्हा अभिषेकला संधी देते की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.