‘अलका याज्ञिक’ने धक्के मारून स्टुडिओच्या बाहेर काढले होते ‘या’ अभिनेत्याला, आज तोच आहे बॉलीवुडचा सर्वात मोठा स्टार…

मनोरंजन
बॉलिवूडमध्ये असे अनेक सिंगर आहेत की ज्यांचे नाव घेतले की अंगावर रोमांच उभा राहतो. कुमार सानू, उदित नारायण यांच्या जोडीने तर हा कालखंड खूप मोठ्या प्रमाणात गाजवला. एक काळ असा होता की कुमार सानू, उदित नारायण यांच्याशिवाय दुसरा गायक मिळतच नव्हता. सर्व कलाकारांची मागणी कुमार सानू आणि उदित नारायण यांना असायची.
प्रत्येक अभिनेत्याला असे वाटायचे की आपल्या गाण्याला कुमार सानू किंवा उदित नारायण या दोघांपैकी कोणीतरी आवाज द्यावा. अशा काळातही विनोद राठोड यांनी आपले नाव टिकून ठेवले होते. या प्रमाणात महिला पार्श्वगायिका यांची देखील खूप चलती होती. त्यावेळी कविता कृष्णमूर्ती यांनी अनेक अभिनेत्रींना आवाज दिले आहेत. तसेच यामध्ये अलका याज्ञिक यांचे नाव देखील आघाडीवर होते.
अलका याज्ञिक यांनी आजवर अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. अनेक अभिनेत्रींचा आवाज त्यांची ओळख बनली आहे. माधुरी दीक्षितचा आलेल्या तेजाब या चित्रपटात त्यांनी तर धुमाकूळ घातला होता. एक दो तीन चार, या गाण्याला त्यांनी आवाज देऊन चार चांद लावले होते. हे गाणे आजही तेवढ्याच चवीने ऐकल्या जाते. त्यानंतर अलका याज्ञिक यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
अलका याग्निक यांनी आजवर अनेक चित्रपटांना गाणी दिली आहेत. ऐश्वर्या राय हिचा हम दिल दे चुके सनम असो, का आणखी कोणता चित्रपट. त्यांनी आपल्या आवाजाने गाण्यांमध्ये चार चाँद लावले होते. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गायिका निर्माण झाल्याने जुन्या गायकांना आता काम मिळण्यासाठी अडचण झाली आहे. तसेच आता गाण्याचा कल देखील खूप बदलला आहे.
आता गाण्यांमध्ये शब्दांपेक्षा संगीतच अधिक भरलेले असते. त्यामुळे गाणे कुठले आणि संगीत कुठले याकडेच लक्ष ठेवावे लागते. पूर्वीचे गाणे म्हणजे शब्द रचना असलेले सुमधुर आवाज असे समीकरण होते. मात्र, आता ते बदललेले आहे. आज आम्ही आपल्याला अलका याज्ञिक यांच्याबाबत एक ऐकलेला किस्सा सांगणार आहोत.
अलका याज्ञिक यांनी अनेक गाणी तर गायलेली आहेत. हे आपल्याला माहीतच आहे. तसेच त्यांची सोलो गाणे खूप हिट झालेले आहेत. सलमान खान स्टार हम दिल दे चुके सनम हा चित्रपट देखील हिट झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन हिने भूमिका केली होती. या चित्रपटातील चांद छुपा बादल में या गाण्याला अलका याज्ञिक यांनी आवाज दिला होता.
तेव्हा संजय लीला भन्साळी यांनी अनेक गायकांची टेस्ट घेतली होती. मात्र, त्यांच्या पसंतीला कोणाचाही आवाज उतरत नव्हता. अशा वेळी अलका याज्ञिक यांचे नाव समोर आले. त्यावेळी त्यांनी अलका याज्ञिक यांची ऑडिशन घेतली. त्यावेळी त्यांनी ठरवले की आता आपल्या चित्रपटात अलका याज्ञिक गाणी गाणार.
त्यानंतर त्यांनी चाँद छुपा बादल मे, या गाण्याला आवाज दिला आणि हे गाणे एवढे हिट झाले की आजही ती तेवढ्याच खुबीने ऐकले जाते. आमिर खान हा देखील बॉलिवूड पडलेले असेच एक स्वप्न आहे. आमिर खानचा कयामत से कयामत तक या चित्रपटाचे चित्रीकरण खूप वर्षांपूर्वी सुरू होते. आमिर खानचा हा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.
या चित्रपटाद्वारे आमिर खानला ओळख मिळाली होती. त्यानंतर आमिर खान याने मागे वळून पाहिलेच नाही. या चित्रपटाचा एक किस्सा सांगताना अलका याग्निक यांनी एक जुनी आठवण नुकतीच सांगितली आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी अलका याज्ञिक यांच्या समोर एक मुलगा सारखा टक लावून पाहत होता.
त्यामुळे अलका याज्ञिक यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी त्या मुलाला बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ते गाने पूर्ण केले. या प्रकरणामुळे चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर आमिर खान याची अलका याज्ञिक यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांना समजले की, या चित्रपटात आमिर खान काम करत आहे. त्यानंतर त्यांनी झालेल्या कृतीबद्दल माफी मागितली. त्यानंतर आमिर खान याने या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आज तो आघाडीचा सुपरस्टार झालेला आहे.