अरे हे काय ? मानसी नाईक आणि तिच्या पतीची झाली अशी विचित्र अवस्था ! व्हिडीओ बघून तुम्हालाही बसेल धक्का !

मनोरंजन
मराठी सिनेसृष्टीमधली एका नावाजलेली आणि उमदा अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला आज सर्वच जण ओळखतात. मानसी नाईकने जबरदस्त या मराठी सिनेमामधून आपल्या करियरला सुरुवात केली. तिला बघून अनेकांना, मिस वर्ल्ड आणि लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयची आठवण झाली.
तिचा लूक काहीसा, ऐश्वर्या रॉयसारखा आहे असं अनेकांना जाणवलं. सुरुवातीपासूनच अनेकजण मानसी नाईकच्या, ग्लॅमरस अंदाजावर फिदा झाले होते. बघता बघता तिचा खुप मोठा चाहतावर्ग बनला. तिने अनेक मराठी सिनेमामध्ये काम केले. मात्र, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्याने तिला ‘रिक्षावाला गर्ल’म्हणून ओळख मिळवून दिली.
आजही जवळपास सर्वच पार्टीमध्ये, रिक्षावाला गाणं लावून त्यावर थिरकण्याचा अनेकजण आनंद घेतात. अनेक मराठी सिनेमामध्ये मानसीने काम केले आहे. टारगेट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, एकता एक पावर, म’र्डर मि’स्ट्री अशा सिनेमामध्ये मानसीने काम केले आहे. मानसीला अभिनयासोबतच नृत्याची देखील प्रचंड आवड आहे.
नृत्यामध्ये ती अतिशय जास्त पारंगत आहे. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका, यांसारख्या मराठी डान्सिंग रियालिटी शोमध्ये देखील तिने आपला सहभाग नोंदवला होता. मानसी नाईक कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते. अवघ्या १० महिन्यापूर्वी तिने आपला लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड, प्रदीप खरेरा सोबत लग्नगाठ बांधली.
पण प्रदीप अमराठी असल्यामुळे, मानसीचे बरेच चाहते तिच्यावर नाराज देखील झाले होते. अनेकांनी, तिच्या सोशल मीडियावर कमेंट करून आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र, आमचं एकमेकांवर खार प्रेम आहे असं सांगून, मानसीने पुन्हा आपल्या चाहत्यांची मन जिंकली. ती आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून कायमच वेगवेगळे फोटोज आणि व्हिडियोज शेअर करत असते.
आपल्या नवऱ्यासोबतच नाही तर तिने आपल्या सासूसोबत देखील, ठुमके लगावत व्हिडियो पोस्ट केला होता. त्या व्हिडियोला भरभरून लाईक्स आले होते. काहीच दिवसांपूर्वी, मानसी नाईक पुन्हा चर्चेत आली होती. तिने आपला बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती कमालीची क्युट दिसत होती, अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
मात्र, नंतर समजले की एका शॉर्ट व्हिडियोसाठी तिने ते गेटअप केले होते. आता मानसीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. यामध्ये तिने आपल्या पतीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, तिचा पती आणि ती अत्यंत विचित्र स्थतीमध्ये बघायला मिळत आहेत. मानसी आणि तिच्या नवऱ्याच्या दोन्ही भुवया अगदी गडद झाल्या असून त्या जुळल्या गेल्या आहेत.
मानसीच्या गालावर गुलाबी आणि लाल वण उमटलेले बघायला मिळत आहेत. ‘कैसा लगा?’ असं कॅप्शन टाकत, मानसीने हा व्हिडियो शेअर केला आहे. या विचित्र लूक नंतर लगेच पुढचा लूक बघून सगळेच चकित झाले. दुसऱ्या लूकमध्ये मानसी आणि प्रदीप अतिशय जास्त ग्लॅमरस दिसत आहेत. काळ्या रंगाच्या कपड्यात ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांना त्यांचा हा हटके अंदाज खूपच भावलेला आहे. त्यांचा हाच व्हिडीओ सध्या, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.