अरे व्वा ! ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंता अभिनयाव्यतिरिक्त करते ‘हा’ व्यवसाय, ग्राहकांच्या असतात उड्या..

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली. या मालिकेतील सगळ्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. मात्र, विशेष करून शेवंता हिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी अण्णा नाईक बिथरलाच मात्र संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्याचे आपण पाहिले आहे.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमध्ये अपूर्वा नेमळेकर ही दिसली होती. याआधी अपूर्वा नेमळेकर हिने आभास हा या मालिकेतील काम दिले होते. ही मालिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर रात्रीस खेळ चाले ही मालिका करत असताना अपूर्वा नेमळेकर हिने आपला व्यवसाय थाटला होता.
मराठी मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की, ज्या स्वतःचा व्यवसाय करत असतात. यामध्ये आपल्याला “तू तिथे मी” या मालिकेत दिसलेली प्रिया मराठे ही आठवत असेल. प्रिया मराठे हिने देखील मुंबईत व्यवसाय सुरू केला आहे. याच बरोबर आपल्याला अभिज्ञा भावे हिचे नाव देखील घेता येईल. तिने देखील एक आपला व्यवसाय थाटला आहे.
त्याचप्रमाणे तेजश्री प्रधान हिने देखील आपल्या मैत्रिणीसोबत मिळून प्रॉडक्शन हाउस सुरू केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सई लेकुर् हिने देखील आपल्या जुन्या कपड्यांचा लिलाव केला होता. या कपड्यातून मिळणारी रक्कम ती सामाजिक संस्थांना दान देणार आहे. अपूर्वा नेमळेकर ही अतिशय जबरदस्त अशी अभिनेत्री आहे.
रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये अण्णा नाईक सोबत तिची केमिस्ट्री चांगलीच जुळल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रेक्षकांना ही जोडी प्रचंड आवडली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या भागांमध्ये देखील सर्वांनीच चांगल असे काम केले होते.
अपूर्वा चा जन्म 27 डिसेंबर 1998 रोजी दादर येथे झालेला आहे. तिने रुपारेल कॉलेज येथून बीएएमएसची पदवी मिळवलेली आहे, असे असतानाही तिने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि यामध्ये ती यशस्वी देखील झाली आहे. सगळ्यात आधी अपूर्वा हिने ‘आभास हा’ या मालिकेत काम काम करताना दिसली होती.
अपूर्वा नेमळेकर हिने इंटरनॅशनल ज्वेलरी आणि साड्यांचा व्यवसाय सुरू केला असल्याचे सांगण्यात येते. तिने हा व्यवसाय महाराष्ट्राच्या मोठ्या शहरात सुरू करण्याऐवजी छोट्या शहरात सुरू केला आहे. म्हणजे तिने मुंबई पुण्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यापेक्षा साताऱ्याची निवड केली आहे.
साताऱ्यामध्ये तिने आपला हा व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या दुकानांमध्ये अनेक ग्राहक येत असतात आणि तिच्या दुकानातील साड्या देखील घेऊन जात असतात. या माध्यमातून तिला चांगले अर्थार्जन होत असल्याचे सांगण्यात येते.