अरे व्वा ! मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या हरियाणवी सासूसोबत शेतातच लावले ठुमके, पहा VIRAL Video..

अरे व्वा ! मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या हरियाणवी सासूसोबत शेतातच लावले ठुमके, पहा VIRAL Video..

सासू-सुनेचं नातं हे वेगळंच असत. सुरुवातीपासूनच आपल्याकडे या नात्याबद्दल समज-गैरसमज आहेत. मात्र आता ‘सासू’ या शब्दाची प्रतिमा काहीशी वेगळी झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. आधीच्या काळात, आपल्या सुनबाईंना बंधनात अडकवून ठेवणारी सासू आता, तिच्यासोबत मस्त मैत्रीचे नाते निर्माण करत असल्याचे चित्र आहे.

यामध्ये केवळ बॉलीवूडच नाही तर मराठी चित्रपट सृष्टीमधील सासू-सुना देखील अग्रेसर असल्याच आपण पाहिलं आहे. अशीच एक मराठमोळी सासू-सुनेची जोडी, सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मराठी सुपरहिट अभिनेत्री, रिक्षावाला गर्ल मानसी नाईकचा आणि तिच्या सासूचा एक व्हिडियो सगळीकडेच जबरदस्त वायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वीचं अभिनेत्री मानसी नाईकने लग्न केल आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत मानसी लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांची जोडीला सोशल मीडियावर खुपचं पसंत केलं जातं. ते दोघेही सोशल मीडियावर आपले व्हिडीओ आणि फोटो सतत शेयर करत असतात. आणि या दोघांनाही चाहत्यांचं भरभरून प्रेम लाईक्स आणि कमेंटन्सच्या रूपात मिळत असतं.

लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक सध्या आपल्या वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद घेत आहे. मानसी नाईक सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. २००७ मध्ये मानसीने जबरदस्त सिनेमामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होत, आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून नाही पहिले.अनेक गाण्यांवर आपल्या मादक अंदाजामध्ये डान्स करत तिने नेहमीच आपल्या चाहत्यांची संख्या वाढवली आहे.

रिक्षावाला, बाई वाड्यावर या सारख्या तिच्या काही गाण्यांनी तर चाहत्यांना अक्षरशः वेड लावला होता. सध्या मानसी नाईक पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रीय असते. नेहमीच मानसी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आपल्या चाहत्यांना सध्या आपल्या लाईफमध्ये काय सुरु आहे, हे सतत मानसी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगत असते.

आपल्या पतीसोबत देखील सतत काही रिल्स मानसी शेअर करत असते. मात्र आज तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला रील जरा जास्तच खास आहे. आपली आज्जी सासू आणि सासूसोबत मिळून मानसीने या व्हिडियोमध्ये धम्माल केली आहे, आणि आता हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्या अदांनी आणि जबरदस्त डान्सने मानसी कायमच चाहत्यांना वेड लावते. सोशल मीडियावर जेव्हापण मानसी आपला व्हिडीओ शेयर करते त्यावर चाहते लाईक्सचा वर्षाव करतात. तिच्या जवळपास प्रत्येक व्हिडीयोला चाहते भरगोस दाद देत असतात. यावेळी मानसीचा व्हिडियो हटके आहे कारण तिच्यासोबत तिची सासू आणि चक्क आजीसासू देखील धम्माल करताना दिसत आहे.

मानसी सध्या आपल्या सासरी हरियानाला गेलेली आहे. आणि हा व्हिडियो तेथीलच आहे. यामध्ये ती आपली सासू आणि आजीसासूसोबत एका गाण्यावर चांगलेच ठुमके मारत आहे. सासू-सुनेची ही धम्माल पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं आहे. म्हणूनच व्हिडीयोला लाईक्स आणि कमेंट्स करून चाहते चांगलीच दाद देत आहेत. त्याचबरोबर, सासू सुनेच्या या खास-हटके नात्याचं तोंडभरून कौतुक देखील करत आहेत

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *